हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

वाहतूक विभागातील गुन्हेगारी स्वरूपाचे गैवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासकीय सेवेतून कमी करण्याची मागणी..! नुतन रेवतकर यांनी पत्रपरिषदेत केली मागणी

spot_img

वाहतूक विभागातील गुन्हेगारी स्वरूपाचे गैवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासकीय सेवेतून कमी करण्याची मागणी..! नुतन रेवतकर यांनी पत्रपरिषदेत केली मागणी
नागपूर : परिवहन निरीक्षक गीता शेजवळ यांनी वरिष्ठ परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यांनी केलेल्या चुकीच्या आरोपामुळे अनेक महिन्यांपासून शहरातील परिवहन विभागाचे नाव हे बदनामीकारक विषयांमुळे चर्चेत आहेत ज्यामुळे विभागाचे नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात खराब होत असे आरोप सामाजिक कार्यक्रत्या नूतन रेवतकर यांनी टिळक पत्रकार भवन येथे गुरुवारी पत्रपरिषदेत लावले.

शेजवळ यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकाई रवींद्र भुयार यांच्या विषयी केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत स्त्री या नात्याने व सामाजिक कार्यकर्ता म्हणून शेजवळ यांना मदत करण्याकरिता पुढाकार घेतला असता महाराष्ट्राच्या विविध शहरातील परिवहन विभागातील माहिती काढल्यानंतर स्वतः शेजवळ यांच्या विरोधात पूर्वीचे दोन गुन्हे उस्मानाबाद व बार्शी येथे दाखल आहे अशी माहिती मिळाली असे नूतन रेवतकर पत्रपरिषदेत म्हणाल्या.

पुढे या विषयाची माहिती देत त्या म्हणाल्या की लाखोंचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी विभागाने त्यांच्यावर बसविलेल्या चौकशीत शेजवळ या दोषी आढळल्या एवढेच नाही तर त्यांची तीन वर्षासाठी वेतनवृद्धी ही या पार्श्वभूमीवर रोखण्यात आली. त्याचप्रमाणे शेजवळ यांचे पती सुद्धा लाच स्वीकारताना पकडले गेले अशी माहिती ही रेवतकर यांनी या प्रसंगी दिली.

Advertisements

अधिकारी गीता शेजवळ या गंभीर प्रकरणांमुळे नेहमी चर्चेत असतात गाड्यांची योग्यरित्या तपासणी न करता त्यांना चुकीचे फिटनेस प्रमाणपत्र देऊन लाखोंचा अपहार करून शासनाची फसवणूक करण्याचे आरोप ही रेवतकर यांनी यावेळी शेजवळ यांच्यावर केले. शेजवळ यांचे बंधु हे राजकीय पक्षाशी जुडलेले असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे असे सांगून मनोज शेजवळ ही सामान्य लोकांवर दबाव निर्माण करतात त्याचप्रमाणे यांच्यावर विविध प्रकरणात सुमारे दहा गुन्हे दाखल आहे असे ही या वेळी सांगण्यात आले.

विभागात कार्य करत असतांना शेजवळ यांच्या चुकीबद्दल त्यांना वरिष्ठांनी टोकले तर त्यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची शेजवळ या तक्रार करतात पण बयानामध्ये त्यांना साधा स्पर्श केल्याचे ही त्यांनी नमूद केलेले नाही यावरुन त्यांनी केलेल्या आरोपांची गांभीर्यता दिसून येथे त्तपूर्वी अधिकारी मनवर, अधिकारी कांबळे आणि आता विभागात कार्यरत असलेले रविंद्र भुयार यांच्या विरोधात शेजवळ यांनी तक्रार दाखल केली. कायदेशीर पद्धतीने स्वतःच्या विभागात आधी तक्रार न करता गीता शेजवळ यांनी मुंबई येथे तक्रार केली आणि नंतर सेटलमेंट करण्याकरिता अधिकाऱ्यांवर दबाव आणला. तरीसुद्धा परिवहन विभागात कार्य करणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या आणि गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासकीय सेवेतून कमी करण्यात यावे याकरिता जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून लवकर निकाल लावण्याची मागणी नूतन रेवतकर यांनी केली.

यावेळी पत्रपरिषदेत सामाजिक कार्यकर्ता नूतन रेवतकर यांच्यासह माधवी बावने, कल्पना सुर्वे, राणी डोंगरे, विभा सावंत, प्रिती शेन्डे ,भैरवी पालकर, विजया पालकर, किरण तायडे, बबीता मांडवकर, बरखा मांडवकर, हफीजुन्नीसा अली, पायल नरखेडकर, संध्या आस्वले या महिला उपस्थित होत्या.

Advertisements