वाडी येथे पेन्शनर्स दिवस कार्यक्रम संपन्न,
नागपुर – गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन वाडीच्या वतीने 17 डिसेंबर, 40 वा पेन्शनर्स दिवस कार्यक्रम मारोती मंदिर सभागृह वाडी येथे संपन्न झाला.
सर्व प्रथम थोर समाज सुधारक महापुरुषांच्या प्रतिमांना, प्रमुख अतिथी द्वारा माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.
गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन वाडीचे अध्यक्ष एन. एन मिश्रा यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम संपन्न झाला असून, प्रमुख अतिथी, नागपूर येथील केंद्रीय आणि राज्य पेन्शनर्स असोसिएशनचे महासचिव कॉ. जे. पी. धंदरे, सचिव कॉ. एम. व्ही नाईक, सामाजिक कार्यकर्ते आर. आर. मिश्रा मंचवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथीनी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या, मेडिकल सुविधा, वर्तमान सरकारी धोरण आणि या सबंधी सरकारकडे केलेला पत्रव्यवहार यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन पेन्शनर्स असोसिएशन हॉस्पीटल बोर्डाचे सल्लागार डी. डी. गजभिये यांनी केले असून प्रास्ताविक बी.जी. बालपांडे यांनी केले तर आभार पी.बी जगम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सचिव के.बी. इंगळे, कोषाध्यक्ष एस. पी गजभिये, एन. के दत्ता, बी.आर रीनके, के.एम ढोले, बी.एन मेश्राम, एस.व्ही कोसे, बी. बी. निघोट, एन. एम लिमये, टी.एच लिंगायत, डब्ल्यू.एन रागीट, के. सी. डे यांनी विशेष परिश्रम घेतले असून बहु संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.