वाड़ीत मनसे ने केला कामगार दिवस व बुध्द जयंती उत्सव साजरा
वाड़ी,नागपुर – राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार यावर्षी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे १ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिन व बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला .
१ मे महाराष्ट्र दीनाचे औचित्य साधुन प्रशासकीय, सामाजिक,शैक्षणिक, पत्रकारीता, वैद्यकीय, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तत्पश्चात सायंकाळी ६ वाजता भव्य भोजनदानाचा कार्यक्रम आयोजीत कण्यात आला, जवळपास पाच ते सहा हजार कामगार व स्थानिक नागरिकांनी भोजनदानाचा लाभ घेतला.
आयोजकांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले
कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक मनसे कार्यकर्ता योगेश चानापे, अनिल पारखी, धनराज ठाकरे,संतोष पाल,विनोद आवारी, घनश्याम आडे, मनोज शुक्ला ,अरविंद फुसे,अमर खंडाल, नरेंद्र नानोटकर, चरण मेंढे, गौरव लांडगे,राहुल ठाकरे, देविदास भोस्कर,आशिष ताठे,आशिष पोटभरे , रवी समुद्रे,आकाश मिसाळ,विकास उईके योगेंद्र निखारे यांनी केले.
कार्यक्रमाला मनसे महीला सेनेच्या तालुकाध्यक्ष ज्योती ताई गोवारदिपे, शालू ताई इंगळे, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक विजय कामठे, अर्जुन सिंघ, कादिर महाजन, रमेश शर्मा, क्रांतीकारी बहुजन संघाचे श्री काळे साहेब, पत्रकार संघाचे खाकसे सर, कराले सर, माडेकर सर , तलमले सर यांची प्रमुख उपस्थिती होती