हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

वस्तू आणि सेवेच्या अधिकृत मानक आणि निश्चितीकरण पद्धती दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त ठरतात-आंचल गोयल

spot_img

वस्तू आणि सेवेच्या अधिकृत मानक आणि निश्चितीकरण पद्धती दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त ठरतात.
– नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांचे प्रतिपादन….भारतीय मानक ब्युरो बीआयएस नागपूर तर्फे आज जागतिक मानक दिवस साजरा.

नागपूर 14 ऑक्टोबर 2024

कोणत्याही वस्तूचे आणि सेवेचे अधिकृत प्रमाणीकरण आणि निश्चितीकरण करणे हे वैयक्तिक कार्य नसून यासाठी सांघिक प्रयत्नांच्या गरजेसोबतच औद्योगिक, विज्ञान-तंत्रज्ञान, जगता सोबत सहज संवाद असणे आवश्यक असून विविध वस्तू आणि सेवेच्या अधिकृत मानक आणि निश्चितीकरण पद्धती आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले . केंद्रीय ग्राहक व्यवहार , खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय मानक ब्युरो – बीआयएस नागपूर तर्फे आयोजित जागतिक मानक दिना प्रसंगी हॉटेल रॅडीसन ब्ल्यू, येथे ‘ एका उज्वल भविष्यासाठी समायोचित दृष्टीकोन ‘ या परिसंवादात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या .याप्रसंगी भारतीय मानक ब्युरो नागपूरचे संचालक हेमंत आडे प्रामुख्याने उपस्थित होते .

Advertisements

यावेळी गोयल यांनी सांगितले दरवर्षी 14 ऑक्टोंबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या या वर्षीच्या जागतिक मानक दिनाची संकल्पना
“आरोग्य समानतेला प्रोत्साहन देताना डिजिटल परिवर्तन आणि हवामान बदल यासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी मानकांची महत्त्वाची भूमिका” ही असून भारतीय मानक ब्युरो ही संकल्पना सर्वांपर्यंत नेणार असून तिची अंमलबजावणी सुद्धा प्रभावी राहणार आहे .
भारतीय मानक ब्युरोने निश्चित केलेल्या अधिकृत मानकांमुळे अन्नपदार्थाची सुरक्षा, वैद्यकीय क्षेत्रातील औषधी, औद्योगिक क्षेत्रातील सेवा उत्पादने,यांची इत्यंभूत माहिती ही जनसामान्यांना कळत असून आयएसओ अर्थात इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फोर स्टँडरायझेशनचे प्रमाणपत्र मिळालेल्याच वस्तू आणि सेवांना ग्राहकांची पसंती मिळत असते. भारतीय मानक ब्यूरोने अधिकृत केलेले उत्पादन सेवा यांची विश्वासार्हता सर्व क्षेत्रात महत्त्वाची अशी भूमिका पार पाडतात.
नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सुद्धा नवीन मानके आणि प्रमाण निश्चित होणे गरजेचे असून यासाठी भारतीय मानक ब्युरोने नवीन तंत्रज्ञानाची ओळख विविध प्रशासकीय आणि खाजगी संस्थांना करून देणे महत्त्वाचे आहे असे गोयल यांनी स्पष्ट केले .

कोविड काळानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकासाची उद्दिष्टे अजून प्रभावीरित्या राबविली जाऊन हवामान बदलाशी संबंधित नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता भारतीय मानवी रोजी विशेष असे भूमिका राहील असे गोयल यांनी यावेळी सांगितले.

IEC (आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन), ISO (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन) आणि ITU (इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन) च्या स्वैच्छिक सहमती-आधारित आंतरराष्ट्रीय मानकांचे एकत्रीकरण आणि विकास करण्यासाठी 2001 मध्ये जागतिक मानक कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली.IEC ITU आणि ISO च्या सदस्य देशांमध्ये 14 ऑक्टोबर हा जागतिक मानक दिन प्रमाणीकरण निश्चितीकरण आणि मानके निश्चित करणाऱ्या तंत्रज्ञानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस तज्ञांद्वारे साजरा केला जातो.

Advertisements

विविध क्षेत्रासाठी भारतीय मानके निर्माण करणे, त्यांची अचूकतेसंबधी शहानिशा करणे आणि प्रसार करणे हे भारतीय मानक ब्युरोचे पायाभूत कार्य असल्याची माहिती भारतीय मानक ब्युरो नागपूरचे संचालक हेमंत आडे यांनी दिली.

याप्रसंगी आयोजित तांत्रिक सतरा मध्ये विविध विषयावरील तज्ज्ञांनी माहितीपूर्ण सादरीकरण केले .