वर्ल्ड हार्ट डे दिनानिमित्त वोक्हार्ट हॉस्पिटल्सचा उपक्रम, वॉकथॉन आणि झुंबा सत्र आयोजित
नागपुर 2 ऑक्टोबर-: आरोग्य सेवा क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने वर्ल्ड हार्ट डे साजरा करण्यासाठी सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी महिनाभर चालणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले होते. या महिनाभर चालणार्या् उपक्रमांचा एक भाग म्हणून वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने त्यांच्या परिसरात 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत हार्ट अवेअरनेस वॉकथॉन आणि झुंबा सत्राचे आयोजन केले होते.
श्रीमती. आशा वेणुगोपाल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी , फ्लॅग ऑफ सत्राच्या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. हा कार्यक्रम भव्य होता आणि वॉकथॉनसाठी 150 हून अधिक आणि त्यानंतर झुंबा सत्रासाठी 100 हून अधिक जण सहभागी होते. रविवार असल्याने अनेक जण कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागींनी उत्साहाने वॉकथॉनमध्ये भाग घेतला आणि वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूरच्या उपक्रमाचे कौतुक केले.
रोटरीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीमती आशा वेणुगोपाल म्हणाल्या, “सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याबाबत एवढी जागरुकता आणि उपक्रम इतक्या मेहनतीने राबवणारे हॉस्पिटल मी पहिल्यांदाच पाहिले आहे.”
डॉ. नितीन तिवारी , हृदयरोगतज्ज्ञ ,जे वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरमध्ये गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत आहेत, म्हणाले,” स्वतःचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे, जसे की नियमितपणे व्यायाम करणे, निरोगी हृदयासाठी आहाराचे पालन करणे आणि आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश असलेली जीवनशैली अंगीकारणे .”
अभिनंदन दस्तेनवार , सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले, “आम्ही वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेल्या वर्ल्ड हार्ट डे निमित्त अनेक उपक्रम आयोजित केले होते. पण वर्ल्ड हार्ट डे साजरा करणे फक्त नावासाठी नव्हते. आम्ही प्रत्यक्षात संपूर्ण महिनाभर उपक्रमांचे नियोजन केले, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आणि सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात यश मिळविले. ‘वोक्हार्ट है तो भरोसा है’ या आमच्या घोषवाक्याद्वारे सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात वोक्हार्ट हॉस्पिटल्स यशस्वी ठरले. ”