हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

लाडकी बहीण योजनेचा पैसा कुणाच्या बापाच्या नाही ◾️खासदार धनंजय महाडिक यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बच्चू कडू यांचा प्रहार

spot_img

लाडकी बहीण योजनेचा पैसा कुणाच्या बापाच्या नाही

◾️खासदार धनंजय महाडिक यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बच्चू कडू यांचा प्रहार

गोंदिया (प्रमोद नागनाथे ): भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी हे काँग्रेसच्या सभेमध्ये दिसत असतील तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला सांगा आम्ही त्यांच्या करेक्ट कार्यक्रम करू असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Advertisements

त्यावर बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू म्हणाले की हा पैसा का कुणाच्या बापाचा नाही. सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स भरतात त्याचा हा पैसा आहे. त्यांच्या बापाचा हा पैसा नाही. आणि मागितली कोणी होती लाडकी बहीण योजना आम्ही दुधाला भाव मागितला. आम्ही धान पिकाला भाव मागितला होता. पण ते सरकारला जमलं नाही. आणि मतासाठी लाडकी बहीण योजना सुरू करता ही लाडकी बहीण तुम्हाला आता सबक दिल्याशिवाय राहणार नाही.

अशी खणखणीत टीका त्यांनी धनंजय महाडिक यांच्यासह राज्य सरकारवर केली. दरम्यान, खा. प्रफुल पटेल यांनी अर्जुनी मोरगाव चे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना उद्देशून या भागातल्या ठेकेदारांचे पैसे राज्य सरकार थांबवेल या वक्तव्याच्या समाचार घेताना बच्चू कडू म्हणाले की प्रफुल पटेल सारखा माणूस धमक्या देत असेल तर आम्ही अंडूपांडू नाही.

पुन्हा धमकी दिली तर आम्ही त्यांच्या घरावर जाऊ, प्रफुल पटेल यांनी समजून घ्यावं त्यांनी अवकातीत राहावं तर आम्ही अवकातीत राहू. त्यांनी अवकात सोडली तर आम्ही त्याच्यापेक्षा भारी आहोत. असे टीकास्त्र त्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर सोडले. प्रफुल पटेल एक गेल्या काही दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत, ते जर विकासासाठी ठाण मांडून बसले असते तर एवढी गरज पडली नसती. तुम्ही केंद्रीय मंत्री होते तुमच्याजवळ अलटून-पाटून तुमच्याकडे सत्ता आली. सत्तेशिवाय तुम्ही राहू शकत नाही पण विकासाचा डोंगर तुम्हाला उभारता आला नाही. अशी बोचरी टीकाही त्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर केली.

Advertisements