हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

रुग्णालय ◼️आकस्मिक भेट देऊन केली पहाणी, रुग्णांची केली आस्थेने विचारपूस ◼️अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ

spot_img

अन् मुकाअंनी रात्री गाठला अर्जुनी मोरगावचा ग्रामीण रुग्णालय

◼️आकस्मिक भेट देऊन केली पहाणी, रुग्णांची केली आस्थेने विचारपूस

◼️अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ

Advertisements

गोंदिया : जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानथंम यांनी मंगळवारी 3 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजता अचानक अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून तेथील व्यवस्थेची पहाणी केली. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व संबधीत कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुचना केल्या. सीईओंनी अचानकच रात्रीच्या वेळी भेट दिल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी वरदान समजले जाते. येथे सर्व उपचार मोफत केले जात असल्याने या रुग्णालयात ओपीडी मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाकडून बहुतांशी रुग्णांना रेफर टु गोंदिया, भंडारा, ब्रम्हपुरी करण्यात येते. अशातच आज रात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अचानक भेट देऊन त्यांनी रुग्णालयात भर्ती असलेल्या सर्व रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. तसेच संपूर्ण रुग्णालयाची तपासणी करुन रुग्णालयात उद्भवणाऱ्या असुविधेबद्दल नाराजी व्यक्त करून यानंतर कुठल्याही प्रकारे रुग्णांची गैरसोय होणार नाही अशी काळजी घेण्याचे निर्देश संबधीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. तसेच रुग्णालयातील स्वच्छता बद्दल विशेष काळजी घेण्याच्याही सुचना केल्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. गाईण, डाॅ. कापगते व इतर कर्मचारी यांनी संपूर्ण माहिती दिली. यावेळी गोंदिया जिल्हा परिषद चे गटनेते तथा जिप सदस्य लायकराम भेंडारकर, पंचायत समिती सदस्य संदिप कापगते प्रामुख्याने उपस्थित होते.

◾️उपजिल्हा रुग्णालय कधीपासून सुरु होणार

Advertisements

अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नाने मिळाला आहे. आता उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याची जबाबदारी नवनिर्वाचित आमदार इंजि. राजकुमार बडोले यांचेवर आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयातून उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी त्वरीत उपाययोजना करुन उपजिल्हा रुग्णालय त्वरीत सुरु करावे अशी मागणी जनतेची आहे.