हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

राष्ट्रवादीचे मंथन : वेध भविष्याचा ” “ शिर्डी येथे ४ , ५ नोव्हेंबरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभ्यास शिबिराचे आयोजन “

spot_img

राष्ट्रवादीचे मंथन : वेध भविष्याचा ” “ शिर्डी येथे ४ , ५ नोव्हेंबरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभ्यास शिबिराचे आयोजन “
नागपुर – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ४ आणी ५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यासांठी राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . पदाधिकारी , कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थिती संदर्भातील आकलन वाढावे , भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे आणी राष्ट्र तसेच समाजाबदलची बांधिलकी भक्कम व्हावी , या उद्देशाने शिबिराचे आयोजन केल्याची माहिती दुनेश्वर पेठे यांनी शुक्रवारी आयोजित प्रेस क्लब येथील पत्रकार परिषद मध्ये दिली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा . जयंत पाटील यांच्या संक्लपनेतुन साकारलेल्या राष्ट्रवादी मंथन : वेथ भविष्याचा या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा . शरद पवार साहेब , विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा . अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते , राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत , अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत . राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना होऊन तेवीस वर्षे झाली असून येत्या जून महिन्यामध्ये पक्ष रौप्यमहोत्सवी वर्षात पर्दापण करेल .

पक्षाचे अध्यक्ष आणी देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबसह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आणी त्यांच्याच मार्गदर्शनाखली वाटचाल करणाऱ्या पक्षाने आपल्या २३ वर्षाच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे . छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतीराव फुले , राजर्षी शाहू महाराज आणी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाटचाल दमदारपणे सुरू राहीली आहे . पक्षाचा वैचारीक पाया भक्कम असल्यामुळे महाराष्ट्रापुढे निर्माण झालेल्या अनेक आव्हानात्मक प्रशनाच्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणी आदरणीय पवार साहेबांनी राज्याला योग्य दिशा दाखवली .

Advertisements

करोनाच्या संकटकाळात अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजला असतांना या संकटातुन राज्याला बाहेर काढण्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रमुख भुमिका बजावली . आव्हानात्मक परिस्थतीतही आर्थिक आघाडीवर राज्याला अग्रसेर ठेवण्यामध्येही पक्षनेतृत्वाची भूमिका महत्वाची राहीली होती . आरोग्य आणि आर्थिक पातळीवरील कामाचे राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था – संघटनांनी कौतुक केले आहे . पक्षाच्या अतंगत काम करणाऱ्या विविध संघटनांनी वेळोवेळी आपली भुमीका उत्तमपणे पार पाडली . त्याचमुळे महाराष्ट्रातील सुजाण आणि परिवर्तनशील जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठबळ दिले .

या पाठबळामुळेचे आजवरच्या २३ वर्षाच्या प्रवासातील साडेसतरा वर्षे पक्ष राज्याच्या सत्तेमध्ये राहीला . पवार साहेबांनी सातत्याने केलेली विचारांची पेरणी आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केली मशागत यामुळे प्रत्येक आघाडीवर पक्षाने अग्रभानी राहून आपली भुमिका बजावली समविचारी पक्षांना सोबत घेऊन वैचारीक लढाई लढली .

हिच पंरपरा अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी शिर्डी येथे राष्ट्रवादी मंथनः वेध भविष्याचा या अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . आज देशापुढे आणि राज्यापुढे अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत . २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्त्यांची मनोभूमिका अधिक बळकट होण्याची आवश्यक्ता आहे . केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या कारभरामुळे देशापुढे अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात उभे राहीले आहेत . वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदनाच्या या देशातील काही समाजघटकांना सतत भितीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत .

Advertisements

समाजामध्ये फुट पाडण्याचे तसेत विद्वेष निर्माण करण्याचे काम सत्तेच्या माध्यमातुन केले जात आहे . घटनात्मक संस्थाचे खच्चीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे . लोकशाही पद्धतीने आवाज उठवणाच्या विदर्याच्या पासून अभ्यासकांपर्यंतच्या विविध घटकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे . केंदीय यंत्रणांचा दुरूपयोग करून विरोधकांना दहशतीखाली ठेवण्यात येत आहे .

प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करण्यात सुरू आहे . सोशल मिडीयाच्या माध्यमातुन पगारी ट्रोल्सच्या टोळया पोसून पत्रकारांपासून कलावंतापर्यंत विविध घटकांचा छळवाद मांडला जात आहे . आर्थिक आघाडीवर प्रचंड अपयश आले असून तयापासून समाजाचे लक्ष भलतीकडे वळवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येत आहे . २०१४ पूर्वी रूपयाच्या घसरणीचा ठपका तत्कालीन पंतप्रधानांवर ठेवणारे लोक आता रूपयाच्या अभूतपूर्व घसरणीचेही लंगडे सर्मथन करू लागले आहेत . • बेरोजगारीच्या संकटाने अकाळविकाळ स्वरूप धारण केले असून त्याबाबत कुठल्याही टप्यावर गार्भीय दिसत नाही . महागाई आकाशाला भिडली असून त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे .

शिक्षणापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत इतिहासाचे विकृतीकरण खरून खोटा इतिहास थोपवण्याचे प्रयत्न सत्तेच्या माध्यमातुन सुरू आहे . अनेक पातळ्यांवरचे अपयश लपवण्यासाठी धार्मिक मुदयांच्या आड लपण्याचा प्रयत्न केला जात आहे . देशासमोर , राज्यासमोर अनेक प्रश्न असतांना व्हाट्सप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातुन चुकीची माहिती प्रसारीत करून लोंकाना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केले जातात . या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नासंदर्भातील नेमके वास्तव काय आहे , त्या संदर्भातील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल या संदर्भातील मंथन शिबिरामध्ये करण्यात येणार आहे . पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबरच विविध क्षेत्रातील अभ्यासक , विचारवंत , पत्रकार विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत . दोन दिवसांचे हे शिबिर पक्षाच्या निमंत्रित पदाधिकाऱ्यांसाठी आहे . वेदांता आणी टाटा ऐअर बस हे प्रक्लप गुजरात ला नेण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील सुशीक्षीत बेरोजगार तरूणांवर शिंदे सरकारनी अन्याय केल्याचा आरोप शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी पत्रकार परिषद मध्ये केला.पत्रकार परिषद मध्ये दुनेश्वर पेठे,प्रशांत पवार,नूतन रेवतकर ,रमेश फुले सह आदि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements