राज्य योजना व जिल्हा योजनेतून सर्वांगिण विकासासाठी आ.आशिष जयस्वाल यांची समिती नेमणार –
-उपमुख्यमंञी फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
मुम्बई – राज्य योजना व जिल्हा योजनेतून कुठलेही नियोजनबध्द विकास होत नसून प्रत्येक जिल्ह्यात व्हिजन डाॅक्युमेंट करुन राज्याच्या विकासाचे जे १७ ध्येय व २३७ इंडिकेटर विशेष केले आहेत.त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व त्यानूसार शासनाच्या प्रत्येक विभागाची ते ध्येये व उदिष्टये पूर्ण करण्यासाठी सुसंगत शासन निर्णय निर्गमित करावे व त्यानूसार जिल्ह्याचा नियोजनबध्द विकास व जिल्ह्याला आत्मनिर्भर करुन त्या जील्ह्याच्या गरजेनूसार उत्पादकता व रोजगार निर्मिती करण्यासाठी अॅड.आशिष जयस्वाल यांची समिती तयार करण्यात येईल अशी घोषणा नुकतीची विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
त्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंञी देंवेंद्र फडवणीस कार्यालयाचे मुख्य सचिव श्रीखर परदेशी व नियोजन विभागाचे सचिव यांची समिती करण्यात येईल,व पुढील २ महिन्यात हि समिती सर्व शासन निर्णय निर्गमित करेल. अशी ही घोषणा उपमुख्यमंञी ना.देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी शासनाच्या निधितून लोकप्रतिनीधींनी मतदार संघाच्या भौतिक विकासाचे निवडक क्षेञातील प्रस्ताव देतात, माञ जिल्हा नियोजन समिती ही नियोजन करित नसून फक्त वेळ करत आहे,फक्त निधी खर्च करत आहे.माञ त्यातून अपेक्षित फल निश्पती होत नाही अशी भुमिका लक्षवेधीत सुचनेद्वारे मांडली.त्यावर उत्तर देतांना ही जवाबदारी आशिष जयस्वाल यांची समिती तयार करुन त्यांच्यावर दिली.
या चर्चेत माजी वित्त मिंञी जयंत पाटील यांनी मान्यतेने सर्व अधिकार क्षेञिय स्तरावरंच ठेवावे अशी मागणी केली.त्यावर उपमुख्यमंञी ना.देवेंद्र फडणवीस यांनी कामाला मान्यता देण्याचे शासन स्तरावर न मागविता क्षेञिय स्तरावर देण्यात यावे असे देखिल जाहीर केले.