हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

युती-आघाडीच्या लढाईत दोन अग्रवालांमध्ये रणसंग्राम ◼️तिसऱ्यांदा होणार आमोरासमोरची लढाई

spot_img

युती-आघाडीच्या लढाईत दोन अग्रवालांमध्ये रणसंग्राम

◼️तिसऱ्यांदा होणार आमोरासमोरची लढाई

(प्रमोदकुमार नागनाथे)
गोंदिया :- गोंदिया विधानसभेत गेल्या २०१४ विधानसभा निवडणुकी पासून अग्रवाल विरुद्ध अग्रवाल असाच सामना रंगत आहे. विशेष म्हणजे, २०१४ च्या निवडणुकीत राज्यात मोदी लाट असतानाही काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांनी भाजपचे विनोद अग्रवाल यांचा पराभव केला होता. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गोपालदास अग्रवालांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने विनोद अग्रवाल यांनी अपक्ष लढत त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे दोघांचे ही पारडे १-१ असे बरोबरीत आहे. त्यात आता २०२४ च्या निवडणुकीमध्ये युती-आघाडीच्या या लढतीत गोंदियात दोन अग्रवालांमध्ये तिसऱ्यांदा रणसंग्राम होणार असून २-१ अशी बढती कोण घेणार, हे औत्सुकाचे ठरणार आहे.

Advertisements

सद्याची स्थिती पाहता २०१९ ला भाजपचे उमेदवार असलेले गोपालदास अग्रवाल यांनी ऐननिवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात घरवापसी करून उमेदवारी मिळवलेली आहे तर विद्यमान अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचे भाजपने निलंबन रद्द करून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गेल्या तीन विधानसभा निवडणुकीपासून येथे अग्रवाल विरुद्ध अग्रवाल अशीच लढत होत आहे. मागील दोन लढती सारखी ही लढतही अटीतटीची होणार यात शंकाच नाही. पण यावेळी भाजपच्या सोबतीला संघटनात्मक रित्या मजबूत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही आमदार विनोद अग्रवाल यांना खासदार प्रफुल्ल पटेल आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांची मिळत असलेली मोलाची साथ त्यामुळे त्यांचे पारडे काही प्रमाणात जड वाटत आहेत. असे असले तरी दुसरीकडे गोपालदास अग्रवाल यांना स्थानिक शिवसेना उबाठाची साथ असून शिवसेनेचे माजी आमदार रमेश कुथे यांची साथ लाभत आहे.

त्यामुळे गोंदिया विधानसभेत अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. एकंदरीत गोंदिया मतदारसंघाकडे लक्ष दिल्यास दोन्ही आघाड्यांकडून वेळीच बंडखोरांची मनधरणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथे थेट लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. असे असतानाच या विधानसभा निवडणूकीत परंपरेप्रमाणे गोंदिया मतदारसंघात अपक्षांचा सहभाग असल्याने त्यांच्याकडून होणार्‍या मतविभागणीचा फटका किंवा फायदा महायुतीला की मविआला मिळणार, यावर जय-पराजयाची गणिते मांडली जात आहेत.

विधानसभा निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना काही विशिष्ट उद्देश्य ठेवून हौशे-नवशे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरतात. यात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विशेषत्वाने समावेश असतो. निवडणूकीच्या निमीत्ताने पूर्वीचे रागलोभ व पक्षाकडून काही आमिष मिळवून घेण्यासाठी असे उमेदवार उमेदवारी दाखल करतात. काही उमेदवार तर आपले प्रभावक्षेत्र दाखवून लक्ष्मीसुत्राचा लाभ होण्यासाठी देखील उमेदवारी अर्ज दाखल करतात. याही वेळी दाखल झालेल्या अर्जाची संख्या जवळपास 28 वर गेली होती. त्यातून झालेल्या महत्वपूर्ण घडामोडींतून तब्बल 13 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. पक्षाचा शब्द पाळल्याचा अभिनिवेश बाळगत हे पदाधिकारी, कार्यकर्ते रिंगणाबाहेर गेले असले तरी निवडणूकीची हौस व स्वतःला मिळणार्‍या मतांसाठी ९ अपक्ष आजही निवडणूक रिंगणात आहेत. छोट्या राजकीय पक्षांचे उमेदवारही गोंदिया मतदारसंघात असल्याने अपक्ष व या छोट्या परंतु मतविभागणीस कारणीभूत ठरणार्‍या उमेदवारांचा सहभाग महायुती व महाविकास आघाडीसाठी निश्चितच मोठी डोकेदुखी ठरणार आहे. गोंदिया मतदारसंघात १५ पैकी ९ उमेदवार अपक्ष आहेत. याशिवाय ३ उमेदवार छोट्या राजकीय पक्षांचे अधिकृत म्हणून रिंगणात आहेत. रिंगणात असल्याने ते देखील लढतीमध्ये निर्णायक मते मिळविणारे ठरणार असल्याने महायुती व मविआला मतविभाजन टाळण्यासाठी कसरत करावी लागणार हे निश्चित

Advertisements

असे आहेत उमेदवार…

गोपालदास अग्रवाल ( काँग्रेस), विनोद अग्रवाल (भाजप ), नरेंद्र मेश्राम (बसप ), सुरेश चौधरी (मनसे ), राजेशकुमार डोये (राईट टू रिकॉल पार्टी), सतीश बन्सोड (वंचित ), अरुण गजभिये (अपक्ष), ओमप्रकाश रहांगडाले (अपक्ष), गोविंद तिडके (अपक्ष), चंद्रशेखर उर्फ बालु लिचडे (अपक्ष), दुर्गेश बिसेन (अपक्ष), नागेश्वर दुबे (अपक्ष), डॉ. विनोद बडोले (अपक्ष), सुरेश टेंभरे (अपक्ष), संतोष लक्षणे (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.

छोटे पक्षही लक्षवेधक
गोंदिया मतदारसंघात छोट्या पक्षांनी आपली ताकद लावत उमेदवार उतरविले आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, राईट टू रिकॉल पार्टी या छोट्या पक्षांचा समावेश आहे. या पक्षातील उमेदवारीही लक्षवेधक ठरणार आहे.

Advertisements