मेंढपाळ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन
शेळ्या, मेंढ्या, घोड्यांसह मेंढपाळ, शेतकऱ्याचे आंदोलन
@नयन उर्फ नरेंद्र मोंढे, यांच्या फेसबुक वरून बातमी
अमरावती – ढपाळ, शेतकऱ्याच्या विविध मागण्या, हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूं, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा मंदिर समोरील प्रांगण ते विभागीय आयुक्त ‘वाडा आंदोलन’ मोर्चा मंगळवार(ता. सात) रोजी काढण्यात आला. मोर्चात हजारो मेंढपाळ, शेतकरी, आपल्या शेळ्या, मेंढ्या, घोडे घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी येळकोट येळकोट जय मल्हार अपना भिडू बच्चू कडू च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता संत गाडगेबाबा समाधी स्थळाला अभिवादन करून वाडा आंदोलनाला सुरुवात झाली.
माजी मंत्री बच्चू कडू व महादेव जानकर गाडगे नगर येथील प्रांगणात दुपारी १.३० वाजता हातात काठी, खांद्यावर घोंगडी, डोक्यावर धनगरी फेटा असा धनगरी पारंपारिक वेशभूषा धारण करून घोड्यावर सवार झाले होते. तर महादेव जानकर यांनीही धनगरी फेटा व हातात काठी घेऊन घोड्यावर स्वार होऊन वाडा आंदोलनाचे नेतृत्व केले.
मोर्चा संत गाडगेबाबा समाधी स्थळ परिसरातील प्रांगणातून १.४५ वाजता निघाला पंचवटी चौक विरांगणा राणी दुर्गावती चौक (गर्ल्स हायस्कुल) चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून राजमाता जिजाऊ स्मारक चौक (आरटीओ चौक) थेट विभागीय आयुक्त कर्यालयावर दुपारी २.४५ वाजता धडकला.
गत आठ दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी राज्य शासनाला शेतकरी आणि मेंढपाळ यांच्या न्याय मागण्यांसंदर्भात अल्टीमेटम दिला होता. मात्र, शासनाने मागण्यांकडे पाठ फिरवल्याने अखेर शेतकरी आणि मेंढपाळ यांना सोबत घेऊन बच्चू कडू विभागीय आयुक्त कार्यालयासमोर “वाडा आंदोलन” करणार केले. राज्यातील मेंढपाळ आपल्या न्याय मागणीकरिता सरकारचे उंबरठे झिजवित असताना त्यांच्या मागण्यांच्या संबधात मुख्यमंत्री कुठलेही ठोस पाऊल उचलत नाहीत.. शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, वण्यप्राण्यांपासून त्याच्या पिकाचे संरक्षण झाले पाहीजे, त्याला पीक नुकसानीचे पिक विम्याव्दारे भरपाई मिळणे गरजेचे आहे, राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या काळात घोषीत केलेली सरसकट कर्जमाफी शेतक:यांना तातडीने मिळावी, चराईकरिता परराज्यातून येणा:या मेंढपाळांवर बंदी घालण्यात या मागण्या घेऊन वाडा आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू ,महानगरप्रमुख बंटी रामटेके, प्रदेश प्रवक्ते जीतू दुधाने, मंगेश देशमुख, शेख अकबर, संजय देशमुख, शाम इंगळे, राजेश वाटाणे, संतोष किटकले, बल्लू जवंजाळ, दीपक बंड, अभिजीत देशमुख, संजय इंगळे, यांच्यासह मेंढपाळ शेतकरी हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.
आयुक्त कार्यालयाला आले छावणीचे स्वरूप
वाडा आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी २ पोलीस उपायुक्त, ४ एसीपी, २२ पोलीस निरीक्षक, ५५ पीएसआय, एपीआय ३५० अमलदार यांच्यासह रॅपिडक्शन फोर्स, वज्र, अग्निशमन दल बंदोबस्तात होते यावेळी पोलीस दल बॉडी प्रोटेक्टर परिधान करून हातात लाठी डोक्यात हेल्मेट घालून विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पारंपरिक वेशभूषा, वाद्य,नृत्य
आंदोलक मेंढपाळ बांधव पारंपारिक वेशभूषा धारण करून आपल्या पारंपारिक वाद्यावर नृत्य करीत होते.यावेळी डोक्यावर मळवट लावून हातात पिवळे झेंडे घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. येळकोट येळकोट जय मल्हार अपना भिडू बच्चू कडू , बच्चु भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत होते.
मेंढपाळ व शेतकऱ्यांसाठी सातत्याने रस्त्यावरचा लढा देणार- महादेव जानकर
अमरावती जिल्हा मुख्यमंत्र्यांचा आजोळ असून त्यांनी मेंढपाळांचे प्रश्न सोडवावे मेंढपाळांनी आणखी किती दिवस केवळ मेंढरच राखायची? मेंढपाळांच्या मुलांसाठी अद्यापही वसतिगृह सुरू झाले नाही. कॅबिनेट मंत्री असताना योजना आणल्या योजना ची घोषणा झाली मात्र योजनेला पैसा दिला नसल्याने अंमलबजावणी झालेली नाही. भाजप महा गद्दार आहे. प्रहार व राष्ट्रीय समाज पक्ष शेतकरी व मेंढपाळ यांच्यासाठी एकत्र आले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी सातत्याने रस्त्यावरचा लढा देणार ही सुरुवात असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
पुढच्या वेळी सर्वांनीच काठ्या घेऊन या-आ बब्चू कडू
आपल्या मागण्या संदर्भात एक महिन्याचा वेळ प्रशासनाला दिला आहे.आज शांततेत एकटाच काठी घेऊन आलो आहे. एक महिन्यानंतर सर्वांनीच आता काट्या घेऊन आठ दिवस मुक्कामासाठी यायचं आहे. ऐकलं तर ठीक नाहीतर पुढच्या वेळी हटा सावन की घटा. पुढच्या वेळीस इथं आल्यावर पुन्हा जाणार असा इशाराही बच्चू कडू यांनी ‘वाडा आंदोलन सभेत बोलताना दिला आहे.
हिंदू शेतकरी, हिंदू मेंढपाळ. मी हे का बोलतोय कारण धर्माच्या नावाने काहीजण राजकारण करताय. एकीकडे शेतकरी मरतोय, दुसरीकडे मेंढपाळ मरतोय. राज्यात बगर मेहनतीच्या योजना सुरू केल्या. मात्र ज्यांना डोळे नाही, पाय नाही त्यांना चार महिन्यापासून पगार नाही. त्यामुळे अजितदादा कुठं गेला तुमचा वादा. अशा म्हणण्याची वेळ आली आहे. कायदा मोडून हात लावला तर उद्या हातात कायदा घेतल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वाडा आंदोलन सभेत बोलताना दिला आहे.
आंदोलन सभेत बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी करत सरकारवर निशाणा धरला.
चारा आहे पण हात लावू देणार नाही हा कसला कायदा आहे. बटेंगे को कंटेंगे म्हणताय, तर मग मेंढपाळ पण कटणार ना? आता जर कर्ज भरलं नाही तर पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही, कृषिमंत्री म्हणाले की आर्थिक परिस्थिती चंगली नाही. त्यामुळे चार पाच महिने कर्जमाफी होणार नाही. मग बोंबलता कशाला. जेवायला बोलवायचं आणि पळून जायचं. मात्र हम रुकने वाले औलाद नही चलने वाले औलाद है, मेंढपाळ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मेलो तरी चालेल. असा निर्धारही बच्चू कडूंनी यावेळी बोलताना केला आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देण्याकरिता बच्चू कडू महादेवराव जानकर यांच्यासह मेंढपाळ शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जात असताना बंदोबस्त करिता असलेल्या पोलीस बच्चू कडू यांना बॅरिकेटच्या आत मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात सोडले मात्र काही वेळ महादेव जानकर यांना पोलिसांनी अडवून ठेवले होते. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आत पोलीस प्रशासनाकडून प्रसिद्धी माध्यमांनाही प्रवेश बंदी केली होती.