हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक बोधगया येथे रवाना

spot_img

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक बोधगया येथे रवाना

नागपूर,दि. ५ : महाराष्ट्र शासनाच्या  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नागपूर येथून बोधगया येथे २३६ नागरिक आज विशेष रेल्वेने रवाना झाले.

आज रात्री नागपूर येथील मुख्य रेल्वे स्टेशन येथून ही रेल्वे रवाना होणार झाली. खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार आशीष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखविली.

Advertisements

रवाना होण्यापूर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दूरध्वनीवरून प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे.  या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नागपूर येथून हे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले आहेत.