हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…..पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील ४७० सदस्यांनी घेतला लाभ…गगन मलिक यांची खास उपस्थिति

spot_img

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…..पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील ४७० सदस्यांनी घेतला लाभ….गगन मलिक यांची खास उपस्थिति

अमरावती – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अमरावती जिल्ह्याच्या वतीने पत्रकार व त्यांचे कुटुंबीय यांच्यासह पत्रकारिता क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्वच घटकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर रविवार (दि.१६) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बचत भवन येथे घेण्यात आले. यावेळी ४७० जणांनी आरोग्य संबंधित विविध आजारांवरील तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.सोबतच उपस्थित मान्यवरांनी स्वतः आपल्या आरोग्याची तपासणी केली.

कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गगन मलिक फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सिने अभिनेता गगन मलिक यांची विशेष उपस्थिती होती. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ हरिदास भालेकर यांनी केले तर शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार होते. अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदळे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, , डॉ. ऋषिकेश नांगलकर, डॉ. संतोष राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, दंत चिकित्सक डॉ. अभिजीत वानखडे, सिटी न्यूज चे संपादक डॉ चंदू सजोतिया, साहित्यिक डॉ. कमलाकर पायस, प्रा. संजय शेंडे, अमरावती पत्रक चे संपादक मुन्ना राठोड, मंगल प्रहर चे संपादक सुधीर गणवीर, राजेश राजपूत, अरुण तिवारी, पवन श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष नयन मोंढे, कार्याध्यक्ष देविदास सूर्यवंशी (मामा) शहराध्यक्ष अजय श्रृंगारे आदी उपस्थित होते.

Advertisements

तत्पूर्वी , मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने राबविलेल्या आरोग्य शिबिर हा त्यांचा उपक्रम स्तुत्य आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणे पत्रकार व पोलीस यांचे ड्युटीची वेळ निश्चित नसते त्यामुळे बऱ्याचदा त्यांना शारीरिक मानसिक त्रासाला समोर जावे लागते पत्रकार जसा समाज हितासाठी कार्य करीत असल्याने महत्त्वाचा आहे म्हणूनच पत्रकार यांचे आरोग्य ही तेवढेच महत्त्वाचे आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन पत्रकारिता करावी असे प्रतिपादन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी यावेळी केले.


पत्रकारांनी पत्रकारिता करीत असताना शांत डोक्याने तणावमुक्त होऊन पत्रकारिता कुल डाऊन करावी त्यासाठीच पत्रकारांनी आपले आरोग्य सर्वप्रथम सांभाळावे कारण पत्रकारांची समाजाला गरज आहे पत्रकारांना आरोग्य संदर्भात काही समस्या आल्यास त्यांच्या त्या जिल्हा सामान्य रुग्णालय उपचार देऊन सोडविणार असल्याचे ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सौंदळे यांनी यावेळी दिली

Advertisements

विशेष अतिथी तथा सिनेअभिनेता गगन मलिक म्हणाले की,
वयाची तिशी उलटल्यानंतर प्रत्येकच नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करावी तेव्हा कुठे त्याला योग्य उपचार मिळतील वेळ गेल्यानंतर त्याच्यासह त्याचा परिवार आजारी पडतो उपचार करीत उपचार करण्याकरिता पैसा लागतो त्यामुळे संपूर्ण परिवाराला आर्थिक फटका बसतो महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून पुढे होणाऱ्या रोगांची आधीच माहित व्हावी याकरिता जागृती करीत आहेत त्याचप्रमाणे सरकारी रुग्णालयांमध्ये ही गरीब रुग्णांना योग्य सेवा मिळावी भविष्यात गगनमलिक फाउंडेशन पत्रकारांना सोबत घेऊन त्यांच्या आरोग्य विषयी विविध उपायोजना करणार असल्याचे प्रतिपादन गगन मलिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिने अभिनेता गगन मलिक यांनी केले


पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून राज्यभरात नावलौकिक असणारी संघटना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविते. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत सर्वच घटकातील व्यक्तींकरिता निःशुल्क सहकुटुंब रोग निदान शिबिराचे आयोजन रविवारी जिल्हा कचेरीवरील स्थानिक बचत भवन येथे करण्यात आले. शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील तज्ञ डॉक्टर व चमुंच्या देखरेखीत रक्ताच्या सर्वच चाचण्या, कान, नाक, घसा, नेत्र, दंत, मुलांमध्ये उदभवणारे आजार, महिलांमध्ये उद्भवनारे आजार ,हृदय धमन्याशी निगडित आजार पोट विकार, त्वचारोग सह सर्वच प्रकारच्या तपासण्या करून मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. दरम्यान कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महपुरूषांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार रोपटे देऊन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक देविदास भालेकर व उत्तम सवाळे यांनी सर्वप्रथम तपासणी करून शिबिराची सुरूवात केली. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चाललेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा ४७० जणांनी लाभ घेतला, यासोबतच औषधांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेने कार्याध्यक्ष देविदास सूर्यवंशी (मामा) यांनी केले. संचालन प्रा. राजरत्न मोटघरे यांनी तर आभार जिल्हा कोषाध्यक्ष उज्वल भालेकर व संघटनेचे अवकाश बोरसे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेने महासचिव शोहेब खान, जिल्हा संघटक मोहित भोजवाणी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अली अजगर दवावाला, शहर उपाध्यक्ष दिलीप जवंजाळ, महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी कोल्हे, महिला शहराध्यक्ष सुरुची बनगैय्या, शहर सचिव सागर डोंगरे, जिल्हा कोषाध्यक्ष उज्वल भालेकर, शहर कोषाध्यक्ष स्वप्नील सवाळे, संपर्क प्रमुख सागर तायडे, समीर अहमद, सतीश वानखडे, वैभव अवटीक, पूर्ण बोरसे आदींनी परिश्रम घेतले.

Advertisements

मान्यवरांनी केली आरोग्य तपासणी- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आरोग्य तपासणी शिबिरात सुप्रसिद्ध अभिनेते गगन मलिक, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे , जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद निरवणे, सिटी न्यूजचे संपादक डॉ. चंदू सजोतीय, न्यूज १८ लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. संजय शेंडे, ज्येष्ठ साहित्यिक कमलाकर पायस, मंगल प्रहरचे संपादक सुधीर गणवीर, अरुण तिवारी, राजेश राजपूत, पवन श्रीवास्तव, युवा दौरच्या संपादिका राजलक्ष्मी केशरवाणी, अमरावती पत्रकचे संपादक मुन्ना राठोड, नासीर हुसेन, अमोल खोडे यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे शेकडो पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी आरोग्य तपासणी केली.

जिल्हा आरोग्य विभागाचे सहकार्य-डॉ. प्रज्ञा चौधरी, सुषमा मोहिते, माधुरी खवले, सुनील तांबट, नितीन कळमकर, वैभव शिवसंभादासे, आकाश मडावी, सुशांत बडगे, साजिक पटेल, डॉ. अभिजीत वानखडे, डॉ. प्राजक्ता निधानकर, डॉ. तन्वीर फारुकी, डॉ. कल्याणी लोंदे, डॉ.शिवानी बोबडे, मोहिनी कऱ्हाडे, तृप्ती तुरक, प्रांजली भगत यांच्यासह होमियोपथिक एमडी डॉ.संतोष चिंचोळकर व डॉ. कविता चिंचोळकर, समुपदेशक उद्धव जुकरे , विनोद साबळे ,यांनी विशेष सहकार्य लाभले.

पत्रकारांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये -नयन मोंढे 
पत्रकार हा आर्थिक परिस्थितीने कमकुवत असल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातून महागडे उपचार तो घेऊ शकत नाही त्यामुळेच रोग होण्याआधी तो त्यातून सतर्क व्हावा हीच शिबिर घेण्यामागेची संकल्पना आहे पत्रकारांनी पत्रकारिता करीत असताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण पत्रकारांच्या मागे त्याचा संपूर्ण परिवार असतो त्यांची जबाबदारी त्याला सांभाळावे लागत असल्याने आरोग्य कडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष नयन मोंढे यांनी केले.