हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

‘मन हरविले माझे’ गाण्याचे लाँचिंग नागपुरात मुख्य भुमिकेत साक्षी मेश्राम, प्रतिक्षा मेश्राम सह विदर्भातील नवोदित कलावंताचा सहभाग

spot_img

‘मन हरविले माझे’ गाण्याचे लाँचिंग नागपुरात

मुख्य भुमिकेत साक्षी मेश्राम, प्रतिक्षा मेश्राम सह विदर्भातील नवोदित कलावंताचा सहभाग

: अनिल सहाने प्रोडक्शन व सिनेएनएक्स म्युझिक मराठी द्वारा निर्मित ‘मन हरविले माझे’ या रोमांचक गाण्यात आजच्या तरुणाईला भुरळ घालावी असे गाणे फिल्म डायरेक्टर, गीत, संगीत आणि दिग्दर्शन अनिल सहाने (मुंबई) यांनी सादर केले आहे.सोमवारी या गाण्याचे लॉन्चिंग प्रेस क्लब नागपुर येथे केले.

Advertisements

गेल्या 10 वर्षांपासून विदर्भातील कलाकारांना नागपूरात संधी मिळावी तसेच फिल्म सिटी व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींसाठी जवळ जवळ कित्येक वेळा त्यांनी मागणी रेटून धरली. त्यांच्या या अथक परिश्रमाने नागपूरातील ख्यातप्राप्त कॉलेज असलेले मोहता सॉयन्स कॉलेज परिसरात ‘मन हरविले माझे’ या गाण्याचे शुटिंग करण्यात आले. त्यावेळी विदर्भातील बरेच नवोदित कलाकार सहभागी झाले होते. यावेळी अनिल सहाने यांनी नवोदित कलाकारांना काही टिप्स देऊन हे गाणे कसे हिट होऊन कॉलेज युवाओंमध्ये एक छाप पाडेल यासाठी अतिशय मेहनत घेतली.

आज सोमवार दि. 24 जून रोजी प्रेस क्लब सिव्हिल लाईन, नागपूर येथे ‘मन हरविले माझे’ या गाण्याचे लाँचिंग करताना अतिशय आनंद होत असल्याचे अनिल सहाने म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार मोहनभाऊ मते, प्रमुख पाहूणे सौ. सविता मोहन मते, जीवन डोंटूलवार सर, अर्चना जैनाबादकर, अजय खुडसंगे, भुषण जाधव (झी फेम), रसिका श्रीवास उपस्थित राहतील.

‘मन हरविले माझे’ या गाण्यात मुख्य भुमिकेत साक्षी मेश्राम आणि प्रतिक्षा मेश्राम असून गायिका अंकिता टाकाले, गीत संगीत आणि दिग्दर्शन अनिल सहाने यांचे आहे. डॉन्स कोरीयोग्राफर राशी गजभिये, सहायक कलाकार उन्नती महाजन, फाल्गुनी बडनाग, प्रज्ञा रामटेके, कन्हैयालाल मुरमु यांच्यासह विदर्भातील अनेक कलावंतांचा सहभाग असून आहे. नागपूर येथील श्री. माथुरादास मोहत्ता कॉलेज ऑफ सायन्स येथे झालेल्या शुटींगप्रसंगी कॉमेरा मॅन दिनेश सहाने व मेकअप आर्टिस्ट नकुल श्रीवास उपस्थित होते.

Advertisements