हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

मदारी भटक्या समाजाच्या हक्कासाठी आमदार बच्चु कडू यांचा धामणा परिसरात मुक्काम.

spot_img

मदारी भटक्या समाजाच्या हक्कासाठी आमदार बच्चु कडू यांचा धामणा परिसरात मुक्काम..! मुख्यमंत्री.. यांची बच्चूभाऊ कडूसह ३२१ डेरा (झोपडी) असलेल्या मुक्कामाला रात्री 10.15 ला दिली भेट….मदारी भटक्या जमातींना कायम स्वरुपी जागा व घरकुल आणि जात प्रमाणपत्र देण्याची शासनदरबारी मागणी

नागपुर –  (दिलीप ठाकरे)  महाराष्ट्र राज्यातील मुस्लीम मदारी भटक्या जमातींना कायम स्वरूपी जागा आणि घरकुल बांधुन देण्यात यावी आणि जाती प्रमाणपत्र देण्यात यावे. अशी मागणी पालघर ते विधानभवनावर मागणी मोर्चा आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा असून त्यांच्या हक्कासाठी आमदार बच्चु कडू यांचा धामणा परिसरात ३२१ डेरा ठोकून बसलेल्या मदारी जमातीसोबत मुक्काम ठोकून मागणीला जोर धरु लागला आहे.


महाराष्ट्र राज्यामध्ये मदारी, गारोडी भटक्या जमातीचा इतिहास शिवाजी महाराजाच्या काळापासून राज्यामध्ये आहे. हा समाज महाराष्ट्रात २ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असून विदर्भामध्ये दहा हजार कुंटूब आहे. भारताला स्वतंत्र मिळून ७५ वर्षे झाली. तरीपण हा समाज आज सुध्दा उघड्यावर पाल टाकून जिवन जगत आहे. शासनाचे दुर्लक्ष होत आहे. हा मदारी समाज गावोगावी भटकी करून सरपाचा (सापाचा) खेळ दाखवुन आपला उदरनिर्वाह करीत होता. मात्र, शासनाने सर्प ठेवण्यावर बंदी आणल्यामुळे गारूडयाचे खेळ करणे बंद झाले आहे.

Advertisements

शासनाने या समाजाचा पोटापाण्याचा विचार न करता, आजही या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मीळेल ती मजुरी करून आपले जिवन जगत आहे.
मुस्लीम मदारी समाज भटकी करत असल्यामुळे अशिक्षित आहे. ३० ते ३५ वर्षापासुन या समाजाने भटकंती बंद करून गावोगावी कायम स्वरूपाची झाली आहे. यांच्या कडे मतदान कार्ड, आधार कार्ड, रॕशन कार्ड, पॅन कार्ड असून रहवासी दाखले आहे. अनेक लोकांनकडे जाती प्रमाणपत्रे नाही. मुस्लीम मदारी समाज एनटीबी मध्ये समाविष्ट असून अधिकाऱ्यांकडे जाती प्रमाणपत्राची मागणी केली असता अधिकरी यांना त्याच्या आजोबा-पंजोबाचे नोंदनी दाखले मागतात किंवा आजोबा-पंजोबांनी खरेदी केलेले ५० वर्षा अगोदरचे पुरावे मागतात. मदारी भटकी समाज भटकंती असल्यामुळे आजोबा-पंजोबाच्या जन्माचे पुरावे मीळत नसल्यानी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.


आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रयत्नामुळे विदर्भाच्या काही गावामध्ये काही लोकांना गांव चौकशी अहवाल करून जातीय प्रमानपत्रे देण्यात आले. तसेच सर्व महाराष्ट्र मध्ये गाव चौकशी अवहाल करून प्रमाणपत्रे देण्यात यावे. जेनेकरुन यांच्या मुलांना शाळेमध्ये शिक्षण घेता येईल. त्याच्या उज्वल भविष्यांकरीता प्रमाणपत्रे देण्यात यावे. राहण्यासाठी कायम स्वरूपाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी. शासनाच्या घरकुल योजनेमध्ये घरकुल देण्यात यावी.

मदारी समाजाला न्याय मिळावा म्हणून आमदार बच्चूभाऊ कडू मदारी भटक्या समाजाच्या न्याय व हक्कासाठी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामना (लिंगा) परिसरात न्याय मीळेपर्यंत ३२१ झोपड्यातील परिवारासह तळ ठोकून मुक्कामाला बसलेले आहे.

Advertisements

याप्रसंगी महाराष्ट्र राज्यातील गावोगावामधील विखुरलेली भटकी समाज नागपुर, वर्धा, पुलगाव, चांदूररेल्वे, बडनेरा, परतवाडा, अमरावती, खेड, वाशिम, मुर्तीजापुर, शिंदीरेल्वे, बाबळगाव, यवतमाळ, विदर्भामध्ये रहात आहे. महाराष्ट्र राज्यातध्ये मदारी समाज करमाळा,औरात, इचंल कर्जी, अकलूज, बार्शी, इंदापुर, कोल्हापुर, भूम, परंडा, मालेगावं, पेठ, पुणे, मुंबई, मिरज, सांगली, सातारा, कलवंड, गेवराई, औरंगाबाद, देगलुर, वसमत, अर्धपुल, आष्टी, जामनेर, येवला, शिरूळ, ठेमुर्नी, चालीसगाव, कोपरगाव, श्रीरामपुर, दोळाईचया, टेबुनी, भिगवन, लासनगाव, परभणी, आकोले, लासुर, सावरगाव पिपलवाडी संगमनेर आदीं शहरासह ३२१ परिवाराच्या झोपड्या राष्ट्रीय महामार्गावरील धामना (लिंगा) परिसरात मागणी पुर्ण होईस्तोवर तळ ठोकून बसणार आहे.

अशी माहिती मुस्लीम मदारी समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष इकबाल मदारी, उपाध्यक्ष राजू मदारी, प्रदेश सचिव पप्पू मदारी, सहसचिव अली मदारी, कोषाध्यक्ष गनी मदारी, सदस्य फीरोज मदारी, अब्दुल मदारी, करीम मदारी, छोटू मदारी, शहारुख मदारी, शेख नूर शेकडोच्या संख्येत उपस्थित असलेल्या मदारी भटक्या समाजानी दिली. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त आहे.