हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

भूपेंद्र गनवीर यांच्या लेखनीतुन…! ऋतूराज पुन्हा पुण्यात …! – आज प्रवेशावर अंतिम निर्णय

spot_img

भूपेंद्र गनवीर यांच्या लेखनीतुन…!

ऋतूराज पुन्हा पुण्यात …!
– आज प्रवेशावर अंतिम निर्णय

भंडारा जिल्ह्यातील ऋतूराज हुमणे. एमटेकला प्रवेशासाठी गेला. व्यवस्थेने त्याचा प्रवेश रोखला. वर्ष फुकट जाणार या चिंतेने निरास झाला. त्याची आपबिती सोशल मीडियावर झळकली. ती पोस्ट फेसबुकवर वायरल झाली. तिने अनेकांची झोप उडाली. व्यवस्थेतील अधिकारीही चमकले. अनेक जण ऋतूराजच्या मदतीसाठी सरसावले. 24 तासात चक्र वेगाने फिरली. त्यातून रखडलेला एमटेकचा प्रवेश मार्गी लागण्याची शक्यता बळावली. अधिकाऱ्यांचेही सकारात्मक सहकार्य मिळू लागले. ऋतूराज आज गुरूवारी सकाळी 10 वाजता सरकारी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये जाणार आहे. त्याला प्रवेश मिळणार की नाही. याकडे अख्यां महाराष्ट्राचे लक्ष लागलेआहे.

Advertisements

या वृत्ताची दखल सीईटी सेलचे माजी आयुक्त दयानंद मेश्राम यांनी घेतली. ते सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभूवन यांच्यासोबत बोलले. नेमके काय घडले. ते त्यांनी सांगितले. पोस्ट वाचून ते ऋतूराज सोबत बोलले होते. घटनेचा फिडबॅक नागपूरचे प्राचार्य बोरकर यांनी त्यांना दिला होता. घटना समजून घेतल्यावर महेंद्र वारभुवन यांनी विद्यार्थ्याला सेलमध्ये पाठवा असा निरोप दिला. निरोप मिळताच ऋतूराजने जमवाजमव केली. चार तासाच्या तयारीत मुंबईसाठी रवाना झाला. रात्रीची नागपूरवरून ट्रेन पकडली. जनरलच्या डब्बात चढला. मंगळवारी दुपारी मुंबईत पोहचला. लगेच सीईटी सेलचे कार्यालय गाठले. साहेबांना भेटला. दिवसभर डुलक्या देत कार्यालयातच थांबला. सायंकाळचे पांच वाजले.

पुन्हा कॅबिन ठोठावली. सर मी काय करू अशी विचारणा केली. तेव्हा वारभूवन यांच्याकडून निरोप आला. तु 27 ऑक्टोंबरला पुण्यातील कॉलेजात पोहच. तुला प्रवेश मिळेल. आम्ही मेलवर निरोप पाठवू. या निरोपानंतर तो पुन्हा गटपटला. पैसे मोजके असल्याने गावाकडे परतण्याचा बेत रद्द केला. रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी पुण्याच्या गाडीत बसला. सायंकाळपर्यंत सेलने ठोस निर्णय न घेतल्याचे कळताच माजी जिल्हाधिकारी ई.झेड.खोब्रागडे, मुख्यमंत्र्याचे सचिव भूषण गगराणी, सहसचिव भांगे सक्रीय झाले. रात्रीपर्यंत फोनाफोनी सुरू होती.

ऋतूराज पुण्याला गेला थांबणार कुठे..!जेवणार कुठे..!हा प्रश्न होता. तेव्हा सामाजिक न्याय खात्याचे आयुक्त प्रशांत नारनवरे आठवले. फोनवर त्यांच्यापुढे समस्या मांडताच. ते म्हणाले, त्याला प्रवेश मिळेपर्यंत राहण्याची व भोजनाची व्यवस्था होईल. त्यांनी बार्टीचे प्रमुख धम्मज्योती यांना निरोप दिला. धम्मज्योती यांच्याकडे विचारणा करताच विद्यार्थाला पाठवा. व्यवस्था होईल . त्यानुसार ऋतूराज आज सकाळी बार्टीत दाखल झाला.

Advertisements

सोमवारी रात्रभर रेल्वेच्या जनरल डब्ब्यातून प्रवास केला. मंगळवारी मुंबईत थांबला. रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी पुण्याला जाणारी रेल्वे गाडी पकडली. रात्री सव्वा वाजता पुण्याला पोहचला . रात्र स्टेशनवर काढली. सकाळी बार्टीत पोहचला.

आता प्रवेश प्रतीक्षा

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचे कुलगुरू डॉ.मुंकूद सुतवने यांनी सुध्दा ऋतूराजला हमखास प्रवेश देण्यात येईल असे सांगितले. योगायोगाने जागा रिक्त आहेत असेही ते म्हणाले, सुतवने हे बारावीत पहिले मेरिट होते. सीईटी सेलकडून आम्हाला विचारणा झाली. किरकोळ चुकीने प्रवेश अडला. ऋतूराजला प्रवेश देण्यात यावा.अशी सकारात्मक भूमिका कॉलेजने घेतली असेही ते म्हणाले.
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
वृत्ताची दखल

Advertisements

अलिकडे समाज माध्यमांची विश्वासर्हता वाढू लागली. ऋतूराजचा प्रवेश रोखला…! या मथळ्याखाली एक पोस्ट आली. ती पोस्ट प्रचंड प्रमाणात वायरल झाली. तिने खळबळ माजली. तिची दखल शिक्षण विभाग आणि सामाजिक न्याय विभागाने घेतली. दैनिक देशोन्नतीनेही समाज माध्यमावरील वृत्ताची कालच्या अंकात दखल घेतली. ते वृत्तही वायरल होत आहे.धन्यवाद देशोन्नती.

समाज माध्यमांवर वायरल झालेली
पोस्ट……!

ऋतूराजचा प्रवेश रोखला…!

▪दहा हजार रूपयांअभावी अभियांत्रिकी प्रवेशाला मुकला

▪ही व्यथा आहे. ऋतूराज हुमणे या गुणवंत विद्यार्थ्याcची. गरीबी किती क्रुर असते. ती कशी थट्टा करते. त्याचे हे ह्दयद्रावक उदाहरण. ऋतूराज मोबाईलवर बोलत असताना. त्यांचा रडवेला आवाज कानावर पडत होता. तो माहिती देताना त्याचा कंठ दाटून येत होता. त्याची प्रचिती आल्यावर थोडं विषयातंर केलं. तेवढ्यात तो सावरला. अन् पुन्हा आपबिती सांगू लागला. तो बीई झाला. टक्केवारीत सीजीपीए 8.46 आहे. तो सुमारे 80 टक्याच्या आसपास जातो. . त्यामुळे पुण्यातील नावाजलेल्या सरकारी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये नंबर लागला. त्याने पाच-सात हजार रूपयाची जुळवाजुळव केली. पुण्याचे कॉलेज गाठले. एम.टेक. मध्ये प्रकल्प व्यवस्थापक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा होता. तो ज्या गटातून प्रवेश घेणार होता. त्यासाठी 18 विद्यार्थांना कॉल होता. त्यापैकी 17 जणांचा प्रवेश झाला.पैशाअभावी ऋतूराजला प्रवेश न दिल्याने ती जागा रिकामी राहिली. ऑफर आली अन् प्रवेश घेतला नाहीतर त्याला प्रवेशच मिळत नाही. वर्ष फुकट जातं. ही त्याची आपबिती..!

पुण्यात असं घडलं….!

ऋतूराज निवड समिती समोर हजर झाला. समिती सदस्यांनी विचारपूस केली. त्यानंतर दीड लाख रूपये भरा . तेव्हाच प्रवेश पक्कं होईल असं त्याला सांगण्यात आलं. रक्कम ऐकताच तो हादरला. समिती सदस्यांसमोर गयावया करू लागला. तेव्हा त्याला सांगण्यात आले. किमान पन्नास हजार रूपये भरावेच लागतील. तात्पुरते दहा हजार रूपये भरण्यासही त्याच्याकडे नव्हते. ऋतूराज म्हणाला, सर मला शिष्यवृत्ती मिळेल. आता फी भरावी लागत नाही. त्याने काही मित्रांना फोन केले. मित्रांनी सांगितले. आता पैसे भरावे लागत नाहीत. शिष्यवृत्तीतून फी ची रक्कम वळती केली जाईल. सदस्य म्हणाले, तु डायरेक्टरला भेट. त्यांनी परवानगी दिली. तर प्रवेश मिळू शकेल. तो सामाजिक न्याय खात्याच्या वेबसाईट उघडून दाखवत होता. मी शिष्यवृतीस पात्र आहे. हे सांगत होता. समिती सदस्य आमच्या वेबसाईटवर दिसत नाही असं म्हणून नकारघंटा वाजवित होते. त्याने डायरेक्टरचा फोन मागितला. तेव्हा तेवढ्या मोठ्या माणसाचा मोबाईल देण्यास नकार दिला. ऋतूराज डायरेक्टर कार्यालयात गेला. तेव्हा साहेब बैठकीत आहेत असं सांगण्यात आलं. अखेर सायंकाळचे पांच वाजले. प्रवेश वेबसाईट बंद झाली. सामाजिक न्याय खात्याचे आयुक्तांकडे हस्तक्षेपाची विनंती केली. त्यांच्याकडून सायंकाळी सात वाजता प्रतिसाद मिळाला.त्या क्षणी त्याचा प्रवेश हुकला होता. तो रडवेल्या चेहऱ्याने गावाकडे परतला. शिष्यवृत्ती गरजूंसाठी …! त्यासाठी नियम, कायदे बनविण्यात आले. ते सर्व कुचकामी ठरले. त्यात काय बदल करावयाचे ते संवेदनशील सरकारने करावे. इंथे शिष्यवृत्तीही कामी आली नाही. ऋतुराजचे हे एक प्रकरण उजेडात आले.असे किती ऋतूराज या व्यवस्थेचे बळी ठरत असतील. त्यांचा हिशेब नाही. इकडे व्यवस्था दिवाळी साजरी करीत आहे. तिकडे ऋतूराज एम.टेक. प्रवेशाच्या चिंतेत आहे.

एकल परिवार…!

2021 मध्ये पित्याला गमावले.अन् आता पदव्यूत्तर प्रवेश हुकला. आई, मुलगा चिंतेत आहे. कोरोनाने थैमान घातला. त्यात वडिलाचा रोजगार गेला. हाताला काम नाही. चुल पेटणे मुश्किल झाले. त्या चिंतने आजारी पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.आई मोलमजूरी करते. त्यातून घरसंसार चालते. ऋतूराजला मोठी बहिण आहे. ती आयटीआय झाली आहे. दोघेही कष्ट करीत शिकतात. ऋतूराज बारावी चांगल्या गुणांनी पास झाला. बीई केलं. आता एम.टेक.चे शिक्षण घेण्याचे स्वप्न होते. त्यासाठी पुणे गाठले. त्याच्या स्वप्नावर व्यवस्थेने पाणी फेरले. ऋतूराजचे गाव खरबी.भडाऱ्यापासूव 12 किलोमीटर अंतरावर. या भागाचे आमदार, खासदार, पालक मंत्री आणि सामाजिक न्याय खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. होतकरू मुलाला न्याय मिळवून देण्यास संघटनांनी पुढाकार घ्यावा. प्रवेश मिळवून द्यावा. एवढीच ऋतूराजची अपेक्षा आहे. निर्दयी व्यवस्थेच्या जाळ्यातून बाहेर निघण्यास तो धडपडतो आहे. ऋतूराज खचू नको. हिंमत ठेव.

समिती सदस्य हंसत होते…!

ऋतूराज समिती सद्स्यांपुढे विनवणी करीत होता. तेव्हा सद्स्यांनी त्याला सर्वासमोर उभे केले. हा म्हणतो, शिष्यवृत्ती मिळेल. मला प्रवेश द्या. या शब्दात हेटाळणी करीत होते. ही अतिशय चीड आणणारी घटना. या घटनेची चौकशी व्हावी. नियम मदतीसाठी असतात. अन्यायासाठी किंवा गरिबीची चेष्ठा करण्यासाठी नाहीत. चुक यंत्रणेची असेल. तर शिक्षा विद्यार्थ्याला नको. ऋतूराजला एम.टेक.मध्ये प्रवेश मिळावा. तो कसा देता येईल. ते सरकारने व यंत्रणेने ठरवावे. एवढेच..!( ऋतूराज रमेश हुमणे,खरबी,जिल्हा- भंडारा. मोब.7498622471 )
▪-भूपेंद्र गणवीर
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪