भरधाव टिप्परची विजेच्या खांबाला धडक
◼️गोरेगाव-ठाणा मार्गावरील घटना
गोंदिया : गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गोरेगाव ते ठाणा मार्गावर बोटे गाव परिसरात भरधाव टिप्परने विजेच्या खांबाला धडक दिल्याची घटना बुधवारी 11 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विजेचा खांबाचे दोन तुकडे होऊन महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे.
सद्यःस्थितीत गोरेगाव ते ठाणा मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून दरदिवशी छोटे-मोटे अपघात घडत आहेत. असे असताना या मार्गावरून अवजड वाहने भरधाव वेगाने जात आहेत. त्यामुळे या मार्गावर नेहमीच मोठ्या अपघाताची शक्यता बळावली असते. त्यातच आज, दुपारच्या सुमारास गोरेगावकडून ठाणाच्या दिशेने जाणार्या एमएच 35 एजे 0562 क्रमांकाच्या टिप्पर चालकाने पुढील ट्रकला ओव्हर टेक करण्याच्या नादात आपले वाहन भरधाव वेगात चालवून बोटे गावशिवारातील रस्त्याच्या कडेवरील विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की विद्युत खांबाचे दोन तुकडे होऊन टिप्पर शेजारील एका मोठ्या झाडावर आदळले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे.
00000000