हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

पुस्तक वाचनातून धैर्यवान माणूस घडतो :प्र-कुलगुरु संजय दुधे…नागपूर ग्रंथोत्सवाचे समापन

spot_img

पुस्तक वाचनातून धैर्यवान माणूस घडतो :प्र-कुलगुरु संजय दुधे…नागपूर ग्रंथोत्सवाचे समापन
नागपूर, दि. ४ :
इंटरनेट,सोशल मिडीया वापरणाऱ्यामंध्ये संयमाचा अभाव दिसतो. धैर्यशीलता हा गुण दिसत नाही. चिंतनाची जोड तिथे मिळत नाही. मात्र पुस्तक वाचणारा व्यक्ती, संयमी व धैर्यवान असू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे यांनी रविवारी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनाय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय नागपूर ग्रंथोत्सव-२०२२ चे आयोजन करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग रोडवरील दीक्षांत सभागृहात आयोजित समारोपीय समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ.संजय दुधे बोलत होते. यावेळी मंचावर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.मंगेश पाठक, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभाकर साठे, जिल्हा ग्रंथपाल गजानन कुरवाडे उपस्थित होते.

दुधे यांनी मोबाईलला आधुनिक काळातील अणु बॉम्बची उपमा देताना सांगितले विज्ञान आपल्यासाठी वरदान आहे, मात्र आपण याला शाप बनवतोय. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तरुण पिढीमध्ये वाचनसंस्कृतीचा विकास होईल, असा विश्वास दुधे यांनी व्यक्त केला. पुस्तकाइतके भरगच्च अनुभव कुणीच देत नाही, अशी भावना मंगेश पाठक यांनी व्यक्त केली. शरीर चांगले असले आणि मन खराब तर काही उपयोग होत नाही. मनाच्या व्यायामासाठी ग्रंथांचे वाचन हे सर्वोत्तम आहे, असा सल्ला प्रभाकर साठे यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन वैदैही चवरे सोईतकर यांनी केले. ग्रंथोत्सवाच्या अंतर्गत दिवसभर परिसंवाद, कथाकथन, कार्यशाळा आदींचे आयोजन करण्यात आले.

Advertisements

पुस्तकातून थोर महापुरुष घडतात
ग्रंथोत्सवात सकाळच्या सत्रात वाचन संस्कृती आणि ग्रंथालयाचे योगदान या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले. पुस्तकांमध्ये थोर पुरुष घडविण्याची क्षमता असल्याची भावना प्रसिद्ध लेखक धनराज डहाट यांनी परिसंवादात व्यक्त केली. आमदार अभिजीत वंजारी यांनी शहरात वाचनसंस्कृतीच्या विकासाकरिता विधानपरिषदेत अनुदानासाठी आवाज उचलण्याचे आश्वासन दिले. परिसंवादात राष्ट्रीय वाचनालय,महालचे अध्यक्ष पद्मश्री तांबेकर यांनीही सहभाग घेतला.
स्पर्धा परीक्षासाठी कार्यशाळा
ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी व्यक्तीमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेतील सहायक प्राध्यापिका डॉ.सुजाता दामके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसे मिळवावे याबाबत मार्गदर्शन केले. गडचिरोलीतील शंकरराव मल्लेवार कला महाविद्यालयाचे प्राचार्य मनिष शेटे यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यशाळेनंतर नाट्य कलावंत वत्सला पोलकमवार आंबोणे यांच्या आत्मकथनाचा कार्यक्रम पार पडला.