पाठराखण–सरला केशवराव ठमके
आज मायचा वाढदिवस!!!
दहावी पास झाल्यावर नेमकं काय करावे. या मनस्थितीत असताना मी आयटीआय, डीएड सर्व जागी फॉर्म भरले. दोन्ही जागी नंबर लागला. नेमकं करायचं काय? हा प्रश्न डोळ्यासमोर होता, कुठल्याच प्रकारचे मार्गदर्शन नव्हतं. फक्त शिकायचं एवढं माय बापाला वाटायचं. पण नेमकं काय शिकायचं ,कुठला अभ्यासक्रम घ्यायचा. याचा थांग मात्र पत्ता नव्हता. अखेर एका गावातल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मी आयटीआय ला ऍडमिशन घेतलं. सोबतच वसतीगृहाचा ही फार्म टाकला. आयटीआय नंबर लागल्याचे पत्र आले, मी कुठले दिवस वाया न घालवता. वरोरा जान्याची तयारी केली. तेव्हा गावातून एकच सकाळची बस असायची, मायला सकाळी डबा बनवला. चांगला आठवते .
मोकळं बेसन आणि तेल लावून केलेल्या पोळ्या त्याला आम्ही पराठे म्हणत होतो. बापाने खिशामध्ये तीनशे रुपये दिले. तेव्हाचे तीनशे म्हणजे आताचे तीन हजार, एक टिनाची पेटी, त्याच्यात आपलं बस्तान कोंबलेल. चड्डी बनियान ड्रेस, मुरमुर्याचा चिवडा, काही पुस्तक. असा हा माझ्या पुढच्या प्रवासाचा संसार.
माझ्या मायेचा काका तालुका विस्तार अधिकारी समाज कल्याण विभागाचे त्याच्याकडे काम होतं. गेल्या गेल्या त्याच्याकडे मुक्काम ठोकायचा असं माझ्या मायने मला बजावून सांगितलेलं. कारण परतीच्या काळात तो भिशीला पोलीस स्टेशनला क्लर्क असताना ,त्याच्या जेवनाच्या राहण्याची व्यवस्था कपडे धुन्यापासून, सारं आमच्या घरी त्याची व्यवस्था होती.
एकदाचा वरोरा आला. मी शोधत शोधत डायरेक्ट पंचायत समितीत पोहोचलो. माझ्या आज्याने विचारपूस केली. जेवणाचा विचारलं. मधातल्या सुट्टीत घराकडे जाऊ असं सांगून त्यांनी मला ऑफिसमध्ये बसायला सांगितलं. मधातली सुट्टी झाली नंतर आम्ही घरी गेलो. आजींनी पहिला प्रश्न केला. आता तू काय इथेच राहणार.. आज्या न मदातच उत्तर दिलं… नाही त्याची होस्टेलची व्यवस्था होईपर्यंत राहील आपल्याकडे..
आजीने उसासा टाकला, जणू तिच्यावर फार मोठे संकट आलं होतं. कपडे धुनी भांडी घासणे, माझ्या वाटेला जे काम येईल, ते मी आनंदाने करत होतो. काही अंतरावर म्हणजे बस स्टॉप च्या बाजूला आयटीआय होता. दहा वाजता पासून आयटीआय सुरू व्हायचा. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत.. अशी दिनचर्या चालली होती. सारं सुरळीत चाललं होतं.इकडे दिवस वाढत होते पण वस्तीगृहाचा नंबर अजिबात लागलेला नव्हता. मंग आजाने मध्यम मार्ग म्हणून, एका प्रावेट वस्तीगृहामध्ये माझी व्यवस्था करून दिली. आजीच्या डोळ्यासमोर एकदाचा मी मुक्त झालो. पण आजची सांगीतले होते, अळी अडचण आली तर मला सांग.. गरजा फार मोठ्या नव्हत्या..दोन वेळचे जेवण पुरेसं होतं. अंगावर कपडे बऱ्यापैकी बापाने घेऊन दिले होते. आयटीआय चा ड्रेस पण होतांच. एकदम मस्त चाललं होतं. त्याच्या एकाच महिन्यात शासकीय वस्तीगृहाला नंबर लागला. आणि खऱ्या जीवनाची सुरुवात झाली. मी आयटीआय झाल्यानंतर काय करायचं कुठे नोकरी करायची याची स्वप्न पाहत होतो. इथेच होल्डाज कंपनी होती.
आयटीआय झाल्यावर हमखास नोकरी असं माझ्या डोक्यात होतं. आयटीआय नियमित सुरू होता.
सोबत माझी कविता होती. लहानपणापासूनच मला गाणे लिहिण्याचा छंद होता. कारण वडील शाहीर होते, त्यांना मदत म्हणून मी जोडजंतर करत होतो. माझ्या कविता आणि वृत्तपत्रापासून प्रकाशित होत होत्या.. सोबतच चळवळीचे बाळकडू सुद्धा होतं. वस्तीगृहामधून मी अनेक साहित्य संमेलन, काव्यवाचन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा एकपात्री अभिनय, इथूनच माझी सुरुवात झाली. लक्ष्मीकांत घुमे ,गीत घोष ,पवन भगत, लोकनाथ यशवंत, दशरथ मळावी, जावेद पाशा, सरला ठमके, या चळवळीतील बाप मंडळीतील ओळखी झाली. कविता बहरु लागली.
वरोऱ्यात अनेक सामाजिक कार्यक्रम होत होते. मी अस्वस्थ बसीन कसा? 14 एप्रिल चा कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू होती. कार्यक्रमाचा नियोजन ठरलेलं होतं. मी गावाला न जाता यावर्षी 14 एप्रिल वरची करायची हे ठरवून मी थांबलो होतो. सोबत आजा होता. वाचनाची हाऊस मी त्याच्याकडील पुस्तकाने पूर्ण करायची. त्या 14 एप्रिल ला मला कविता म्हणायचं चान्स भेटला. आणि बऱ्यापैकी वरोऱ्यातील बुद्धिजीवी वर्गात माझी ओळख झाली. कुणी नंबर घेतले, कुणी जवळी केली ,कुणाची मैत्री कोणाशी मैत्री झाली. खऱ्या अर्थाने त्या दिवशी मला 14 एप्रिल गवसली.
सरला केशवराव ठमके येथे काळच्या वरोर्राच्या उपनगराध्यक्ष, सामाजिक क्षेत्रात मोठे नाव.. केशवराव ठमके बद्दल काय लिहू, बाप माणूस मला नाही वाटत त्याच्याजवळ कोणी माणूस उपाशी गेला असेल. पंचशील फ्रुट सेंटर चळवळीचा अड्डा.. अनेक अनाथ मुलांना नाथ करणारा बाप माणूस… कित्येक जण पडून गेले. पण मायेची छाया आणि बापाचा हात या पठ्ठान पाठीवरून काढला नाही. पाहता पाहता मी घरचा सदस्य झालो. सरला मायचा कविता संग्रह काढायचा होता. माझ्या बऱ्यापैकी ओळख्या होत्या, माझ्या तुटपुंज्या मार्गदर्शनाखाली अखेर सरला मायचा चित्कार नावाचा काव्यसंग्रह आला जावेद पाशा यांची प्रस्तावना अनिल बारसागडे यांचे मुखपृष्ठ असा हा काव्यसंग्रह आला. त्याच वेळेस माझाही काव्यसंग्रह आला असता. पण एका विद्वान कवीच्या मार्गदर्शन घेण्याची चूक मला नडली. कारण त्यांनी सांगितलेल्या निकषात माझी कविता बसत नव्हती. तुमच्या किती वृत्तपत्रात कविता छापून आल्या. कोणत्या मासिकात आल्या.. इथेच मी थांबलो.
हळूहळू आयटीआय झाला. 87 टक्के मार्क मिळाले. समोर सिटी यायला हैदराबादला जावं लागतं. असं कळलं. अप्रेंटिस साठी पत्र आले. कविता बहरत होती. अनेक साहित्य संमेलने कवी संमेलने सुरू झाले. सरला माय मी भुसावळ नागपूर चंद्रपूर वनी वर्धा इत्यादीक दूर दूर कवी संमेलनाला जात होतो. माझा सर्व खर्च.. दादा म्हणजे केशवराव ठमके किंवा माझी माय सरला ठमके करायची. थंडीच्या दिवसात त्यांनी मला नवं कोर स्वेटर दिलं.. ती ऊब अजूनही घेऊन जगतो आहे. दिवसा मागे दिवस निघून गेले… नंतर मला नोकरी लागली. पहिली भेट मी त्यांच्याकडे जाऊन घेतली, फार काही करता आलं नाही या लोकांसाठी, पण ही माणसं मी काळजात जपून ठेवली आहे, आणायसे पाटण वरून बदली माझी वरोरा तालुक्यातील नागरी येथे झाली, नंतर लग्न झालं. हे मायबाप माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, मधातल्या काळात माझी तब्येत बिघडली तर मला लागणाऱ्या फळाची व्यवस्था माझा छोटा बंधू अभिजीत मोठा बंधू हे आई बाबांच्या सांगण्यावरून माझ्यापर्यंत पोहोचत होते, आणखी काय पाहिजे खेमराज ही जीवाभावाची माणसं पैसे देऊन भेटत नाही.अजूनही मी केशवराव ठमके आणि सरला ठमकेसाठी.. त्यांचा मुलगा आहे.
माय आज तुझा वाढदिवस.. तुला दीर्घायुष्य लाभो!!
शक्य झाल्यास मित्रांनो तुम्ही पण शुभेच्छा देवू शकता
सरला केशवराव ठमके
8805218350
तुमच्या कायम ऋणात
तुमचा खेमराज
7798822764