हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

पद्मश्री डॉ सगदेव यांनी अशक्य वाटणारी बाब सहज शक्य केली – न्या. विकास सिरपूरकर

spot_img

 

पद्मश्री डॉ सगदेव यांनी अशक्य वाटणारी बाब सहज शक्य केली – न्या. विकास सिरपूरकर
नागपूर : आरोग्य सेवा कार्यात 43 वर्ष समर्पण भावनेने कार्यरत राहणे ही अशक्य वाटणारी बाब पद्मश्री डॉ.अजय सगदेव यांनी आपल्या कार्यकर्तृत्वावर सहजपणे शक्य करून दाखवली असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. श्री विकासराव सिरपूरकर यांनी केले.

न्या. सिरपूरकर हे डॉ. सगदेव यांच्या संवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहुन बोलत होते. डॉ. सगदेव यांच्या मित्र मंडळाच्या वतीने निमंत्रित नागरिकांसोबत डॉक्टरांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. मुळ नागपूरकर असलेले पद्मश्री डॉ.अजय सगदेव गेल्या 43 वर्षापासून केरळमधील मुट्टिल जिल्हा वायनाड या आदिवासी बहुल भागात स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटलच्या मार्फत अहर्निश आरोग्य सेवा देत आहेत. हॉस्पिटलने आदिवासी विद्यार्थी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी कॉन्व्हेन्ट पद्धतीने शाळा सुरू केली असून सुमारे 200 हून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. एक पूर्ण पिढी सगदेव यांनी आरोग्य सेवेच्या संदर्भात घडविली असल्याचे न्या.सिरपूरकर यांनी सांगून, ही खरोखर कौतुकास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक विश्वास इंदूरकरांनी डॉ.सगदेव व न्या. सिरपूरकर यांचा आपल्या प्रास्ताविकामध्ये परिचय करून दिला.

न्या. सिरपूरकर यांनी सगदेव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. सगदेव यांची आपल्या उपक्रमाविषयी माहिती दिली. त्यानंतर प्रश्न उत्तरे झाली. निमंत्रित नागरिकांपैकी रणजी खेळाडू हेमंत वसू, पर्यटक लेखक श्रीकांत पवनीकर, राजीव साधनकर यांनी उपक्रमाकरिता सहयोग राशी सगदेव यांच्या स्वाधीन केली. विविध क्षेत्रातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चारुदत्त घटवाई, विवेक इंदुरकर, सुधीर अलोणी, विनय सगदेव, देवराव प्रधान व सतेंद्र भारद्वाज तसेच आदींनी परिश्रम घेतलेत.

Advertisements