हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

पत्रकार दिनानिमित्त ६ जानेवारी ला डब्ल्यू एच न्यूज़ तर्फे सन्मान सोहळा..!

spot_img

पत्रकार दिनानिमित्त ६ जानेवारी ला डब्ल्यू एच न्यूज़ तर्फे सन्मान सोहळा..!

नागपूर : राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ संलग्नित डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघा च्यावतीने शनिवार, ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर जयंती अर्थात पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन व सन्मान सोहळ्याचे आयोजन डब्ल्यू एच न्यूज़ तर्फे करण्यात आलेले आहे. सिव्हील लाईन प्रेस क्लब येथे सकाळी ११ ते २ या वेळेत हा सोहळा होणार आहेत. त्यावेळी अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र असतील.

तर जिल्हाधिकारी मा. विपीन इटनकर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, ‘मटा’चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, ज्येष्ठ पत्रकार तथा देशोन्नतीचे संस्थापक व संपादक प्रकाश पोहरे, प्रेस क्लबचे सचिव व नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी,प्रभाकर दुपारे,व्यवस्थापक टिळक पत्रकार भवन, अमन कांबळे,आवाज इंडिया टीवी संचालक , विजय खवसे,डब्ल्यू एच न्यूज़ संपादक आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी ‘डिजिटल मीडिया आणि करिअरच्या संधी’ विषयावर डिजिटल मीडियाचे अभ्यासक देवनाथ गंडाटे माहिती देतील.अशी माहिती भिमराव लोणारे यांनी दिली.

Advertisements