हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

पंचशीलनगर ते दीक्षाभूमी मिरवणूक गुरुवारी -भदंत ससाई यांचे नेतृत्व -दीक्षाभूमीत बुद्धमूर्तीची स्थापना

spot_img

पंचशीलनगर ते दीक्षाभूमी मिरवणूक गुरुवारी
-भदंत ससाई यांचे नेतृत्व
-दीक्षाभूमीत बुद्धमूर्तीची स्थापना
नागपूर, 28 नोव्हेंबर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात गुरुवार 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता पंचशील नगर येथून मिरवणूक निघणार आहे. थायलंडहून आलेली तथागत गौतम बुद्ध यांच्या ध्यानस्थ असलेल्या दोन मूर्ती एका सजविलेल्या वाहनात ठेवून मिरवणुकीने दीक्षाभूमी येथे आणण्यात येतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवनिर्माण स्मारक समिती, पंचशीलनगर आणि युवा भीम मैत्री संघ, बेझनबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मिरवणुकीची तयारी सुरू आहे. अष्ठधातूच्या मूर्ती नऊ आणि साडेसात फूट उंचीच्या आहेत. या दोन्ही मूर्ती सजविलेल्या रथात ठेवून पंचशील नगर येथील मैदानातून मिरवणुकीने निघणार आहे.

भदंत ससाई बुद्धमूर्ती असलेल्या रथात विराजमान असतील. पंचशील नगर, कमाल चौक, इंदोरा, बेझनबाग, कडबी चौक, संविधान चौक, सीताबर्डी मार्गे ही मिरवणूक सकाळी 9.30 वाजता दीक्षाभूमी येथ पोहोचेल. मिरवणुकीत थायलंडचे भिक्खू संघ, उपासक-उपासिका आणि आंबेडकरी अनुयायी सहभागी होतील. पांढरे वस्त्र परिधान केलेल्या अनुयायांच्या हातात पंचशील ध्वज राहणार आहे.

दीक्षाभूमी येथील स्तुपात नऊ फूट उंचीची बुद्धमूर्ती दान दिल्यानंतर थायलंडच्या भिक्खू संघाद्वारे बुद्धवंदना घेण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत ससाई तर प्रमुख अतिथी म्हणूक दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड उपस्थित राहतील. साडेसात फूट उंचीची दुसरी मूर्ती भदंत ससाई यांच्या हस्ते बुद्धवन (काटोल रोड)च्या पदाधिकार्‍यांना भेट स्वरूपात देण्यात येईल.

Advertisements

मिरवणुकीच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवनिर्माण स्मारक समितीचे अध्यक्ष इंद्रपाल वाघमारे आणि युवा भीम मैत्री संघाचे अध्यक्ष दीपक वासे आणि पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.