नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आविमो राज्य भर आन्दोलन करणार -नारायण बांगड़े
– नाशिक जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
नाशिक दि.६/ नागपूर अंबाझरी तलावा शेजारी असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी फक्त नागपूर शहरातील काही मोजके लोक आंदोलन करीत आहेत या आंदोलनाला जेव्हा पंर्यत राजकीय स्वरूप येणार नाही तेव्हा पंर्यत शासन दखल घेणार नाही.आता आंबेडकरी विचार मोर्चा राज्यभर आन्दोलन करणार असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले.
ते आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यस्तरीय आंदोलन/ निवेदन कार्यक्रमाच्या प्रारंभ करताना बोलत होते या प्रसंगी आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे प्रदेश सचिव नितीन काळे, पच्छिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष रवींद्र अहिरे, युवा मोर्चा चे नेते हंसराज उरकुडे, आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते