हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

धाकधुक वाढली… गोंदियात उत्सुकता शिगेला ◼️भंडारा व गडचिरोली दोन्ही मतदारसंघाकडे लक्ष

spot_img

धाकधुक वाढली… गोंदियात उत्सुकता शिगेला

◼️भंडारा व गडचिरोली दोन्ही मतदारसंघाकडे लक्ष

गोंदिया (प्रमोदकुमार नागनाथ) लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. तेव्हा संपूर्ण देशाचे लक्ष याकडे आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्र भंडारा लोकसभेत तर एक विधानसभा क्षेत्र गडचिरोली-चिमूर मतदारसंघात मोडत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दोन लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे मतमोजणी भंडारा व गडचिरोली येथे होणार असली तरी, जिल्ह्यातील मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर या निवडणुकीतून आगामी विधानसभा निवडणूकीच्या दावेदारांचेही भवितव्य ठरणार असल्याने अनेकांची धाकधुक वाढली आहे.

Advertisements

गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व अर्जुनी मोरगाव हे विधानसभा क्षेत्र भंडारा लोकसभा मतदारसंघात तर आमगाव विधानसभा क्षेत्र गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. त्यामुळे लोकसभा निकालावर जिल्ह्याचे आगामी राजकीय समीकरण निश्चित होणार असल्याने या निवडणुकीच्या निकालावर राजकीय क्षेत्रात पैजा लागल्या आहेत. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असून, अनेकांचे राजकीय भवितव्यही ही निवडणूक ठरविणार आहे. भंडाऱ्यात महायुतीतील भाजपाचे उमेदवार खा. सुनील मेंढे यांच्यासमोर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांचे कडवे आव्हान आहे. त्यातच दुरंगी लढत होत असलेल्या भंडाऱ्यात ‘वंचित’ व बसपाचे उमेदवार किती मते घेणार, यावर महाविकाससह महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

दुसरीकडे गडचिरोलीत विद्यमान खासदार महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्याविरोधात नामदेव किरसान यांचे मोठे आव्हान आहे. अशोक नेते विद्यमान खासदार असतानाच नामदेव किरसान यांनीही चांगलीच मेहनत या मतदारसंघात घेतली आहे. त्यामुळे कुठेतरी किरसान यांचेही पारडे जड दिसत आहेत. त्यात भंडारा-गोंदियात कॉंग्रेस असो की भाजप कोणत्याच पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते हे विजय आपलाच होणार हे ठामपणे सांगताना दिसत नाहीत. मात्र, दोन मतदारसंघ जिल्ह्यात असल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यातील राजकारण मात्र, चांगलेच तापल्याचे दिसून आले.

दोन्हीही मतदारसंघांत १९ एप्रिलनंतर अनेक दिवस कोण विजयी होणार, याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर उमेदवार, त्यांचे समर्थक शांत होते. आता निकालाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी उमेदवारांसह त्यांच्या मागे ताकद लावलेले स्थानिक नेते, कार्यकर्ते यांची धाकधूक वाढली आहे. पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची आकडेवारी घेऊन विजयाची गणिते मांडली जात आहे. शेवटी आपलाच उमेदवार कसा विजयी होणार, हे आकडेवारीवरून सांगितले जात आहे. त्यात किती तथ्य आहे, याचा फैसला अवघ्या काही तासात म्हणजे, मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे.

Advertisements

◼️ माळ कुणाच्या गळ्यात पडणार ?

भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील मेंढे की कॉंग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे तर गडचिरोली-चिमूरातून विद्यमान खासदार अशोक नेते की कॉंग्रेसचे नामदेव किरसान विजयी होणार, कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार? याविषयी उत्सुकता वाढली आहे.

◼️काही तासात चित्र उघड.

Advertisements

दोन्ही मतदारसंघांतील विजयावर अनेकांच्या पैजा लागलेल्या आहेत. सट्टाबाजारातही कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे समजते. तेव्हा विजयाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते व पराभवाचा धक्का कुणाला बसतो. तर लागलेल्या शर्यतीत कोण बाजी मारणार व कुणाच्या नशीबी रडकुंडी येणार हे येत्या काही तासात उघडकीस येणार आहे.