डॉ.विवेक चरडे इंग्लंडच्या प्रतिष्ठित FRCPCH पदवीने सन्मानित
नागपुर – इंग्लंडच्या जगविख्यात रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रीक अँड चाईल्ड हेल्थ (RCPCH) या संस्थेने डॉ. विवेक चरडे यांना FRCPCH या सर्वोच्च पदवीने सन्मानित केले आहे. लहान मुलांच्या आरोग्य विषयक सेवांमध्ये उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या जगभरातील मोजक्या व्यक्तींना रॉयल कॉलेज तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
डॉ. विवेक चरडे यांची ही ४ थी आंतरराष्ट्रीय पदवी आहे. मुंबई येथून पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केल्यानंतर लहान मुलांच्या अतिदक्षता (ICU) सेवांमध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल (Gold medal) प्राप्त केले. यानंतर २ वर्षे इंग्लंडला त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची ICU आणि श्वसनरोगातील फेलोशिप साऊदम्पटन येथे प्राप्त केली. यानंतर युरोप व अमेरिकेतील लहान मुलांमधील श्वसनरोग (Pulmonology) आणि निद्रारोग (Sleep medicine) मधील उच्च पदवी आत्मसात केली. सध्या डॉ. विवेक हे नागपूरातील नेल्सन हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. डॉ. विवेक यानी आपल्या यथाचे श्रेय कुटुंबिय आणि त्यांच्या गुरुजनांना दिले आहे.