हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

ठाकरेंच्या वाढदिवसी वाडीत शिवसेनेचे विविध उपक्रम..नप कर्मचार्यास पावसाळी छत्रीचे वितरण करून केला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

spot_img

ठाकरेंच्या वाढदिवसी वाडीत शिवसेनेचे विविध उपक्रम..नप कर्मचार्यास पावसाळी छत्रीचे वितरण करून केला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

वाडी दि. 27 जुलै -माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस वाड़ीत साजरा करण्यात आला.हिंगणा विधानसभा वाडी शहर शिवसेना- युवासेनेने पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त्य शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले .

युवासेना कार्यकारीणी सदस्य व नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती हर्षल  काकडे यांनी केक कापून उध्दव साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर परिषदे च्या सफाई कामगारांना पावसाळ्यात उपयोगी छत्र्या व ईतर साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले.तसेच एम आय डी सी टि प्वाईंट येथिल सपनेश्वर शिव मंदिरात पुजा अर्चना करून उध्दव साहेबांच्या दीर्घायुष्या साठी प्रार्थना करण्यात आली व फळांचे वितरण करण्यात आले.

Advertisements

कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख संतोष केचे,तालुकाप्रमुख संजय अनासाने,उप तालुका प्रमुख रुपेश झाडे, शहर प्रमुख प्रा . मधु माणके पाटिल,युवासेना उपजिल्हा धिकारी अखिल पोहनकर, विजय मिश्रा, कपिल भलमे, तालुकाधिकारी सचिन बोंबले,वाहतूक सेनेचे भाऊराव रेवतकर, धनराज लांडगे, अखिलेश सिंग, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रमोद जाधव, उमेश निकम, राघोजी नागलवाडे,उमेश महाजन,विलास भोंगळे,सुबोध जांभुळकर,दिपक राहांगडाले, अमोल सोनसरे इ. शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.