टिळक पत्रकार भवनात सोमवारी जांभेकरांना अभिवादन
नागपूर, 6 जानेवारी– मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 213 व्या, जयंतीनिमित्त 6 जानेवारीला, टिळक पत्रकार भवनातील त्यांच्या अर्धपुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सर्व पत्रकारांची उपस्थित होती. टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे उपाध्यक्ष व व्यवस्थापक प्रभाकर दुपारे यांनी जांभेकरांना अभिवादन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी हरीश तिवारी, योगेश पांडे, दिलीप कांबळे, भीमरावजी लोणारे तसेच ज्येष्ठ पत्रकार राजीव जोशी यांची उपस्थिती होती.
Advertisements