टाटा एअर बस सी-295 प्रोजेक्ट गुजरात ला दिला
मुख्यमंत्री/उपुख्यमंत्री गुजरात चे आहात की महाराष्ट्राचे,आम आदमी पार्टीचा सवाल…केले हवन आन्दोलन..!
देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचे हित बाळगण्याची बुद्धी मिळण्यासाठी आप चे सद्बुद्धी महायज्ञ*
महाराष्ट्राचे प्रकल्प किती दिवस गुजरातला पळवत राहणार?- आप
आम आदमी पार्टी नागपूर तर्फे फडणवीस यांना सद्बुद्धी यावी व हवन आंदोलन
नागपुर -टाटा एअर बस सी-295 प्रोजेक्ट गुजरात ला दिला,मुख्यमंत्री/उपुख्यमंत्री गुजरात चे आहात की महाराष्ट्राचे, असा सवाल आम आदमी पार्टीने करीत रविवारी संविधान चौकात महायज्ञ हवन आन्दोलन केले.
आंदोलन विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर नागपूर सचिव भूषण डाकुलकर नागपूर उपाध्यक्ष डॉक्टर शाहिद अली जाफरी उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे मध्य नागपुर संयोजक लक्ष्मीकांत दांडेकर दक्षिण नागपूर संयोजक मनोज डाफळे दक्षिण पश्चिम संयोजक अजय धर्मे हे प्रामुख्याने यांनी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महत्वशील दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून नेण्याचा मोठा डाव गुजरातने केला. त्यावर मात्र महाराष्ट्र सरकार म्हणजे शिंदे – फडणवीस सरकार करत तरी काय आहे? ही सरकार गुजरातच्या दावणीला बांधले गेले असा मोठा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करून देणारा वेदांता फॉक्स कॉन व टाटा एअरबस प्रोजेक्ट हा महाराष्ट्रात आला खर पण सरकारच्या निर्लज्ज धोरणा मुळे तो गुजरात राज्य वळवता केला. त्यावर मात्र ना मुख्यमंत्री शिंदे बोलायला तयार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीस तयार फक्त आणि फक्त जुन्या माविआ सरकारवर टीका करण्याचा मग्न आहेत. मात्र या प्रकल्पास रोखण्यास कुठल्याही प्रकारे उपाय करण्यास तयार दिसत नाही आहे.
एवढया मोठ्यावर महाराष्ट्रातील रोजगार जातो आहे यावर लक्ष द्यायला व बोलायला फडणवीस यांना वेळ दिसत नाही. आता आम आदमी पार्टी शांत बसणार नाही या सरकार विरोधात तीव्र आंदोलन करून प्रकल्प नव्याने आणण्यास भाग पाडले व युवकाचा रोजगार हिरवणाऱ्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सद्बुद्धी येवो यासाठी हवन करून शिंदे – फडणवीस सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. आम आदमी पार्टी सातत्याने युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सातत्याने उचलत राहील व या भेदभाव करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करते.
आंदोलनात मेघा वाकोडे, सचिन पारधी, विनायक पाटील, निखिल मेंढवाडे, उमाकांत बनसोड, सुषमा कांबळे, महेश मामीडवार, विनोद काकडे, दिनेश पाटील, नितिन कळसकर, शुभम पराळ, चंद्रशेखर पराड, अतिष तायवडे, विजय तांदूळक, मोहहमद इलियास, धीरज नगरकर, प्रशांत अहिरराव, प्रेम मुंडफळे, सरोज सिंग राजपूत, प्रणित कडू, बबलू मोहाडीकर, तेजराम शाहू, अविनाश शाहू, सोनू फटिंग, जितू मुटकुरे, रोशन डोंगरे, प्रदीप पौनीकर, डॉ. अमेय नारनवरे, नरेश महाजन, पंकज मेश्राम, क्लामेंट डेविड, विशाल वैद्य, शुभम मोरे, मानसिंग अहिरवार, जगदिश रोकडे, मीना तारवानी, किशोर मोदेकर, आकाश वैद्य, अमन देशभरतार, अभिजीत झा, विनीत गजभिये, अनिल बुरेवार, हरीश गूरबानी, संतोष वैद्य, प्रफुल कांबले, गौतम कावरे, सुधीर वासे, मनोज पोतदार, सुरेश खर्चें, कुंदन कानफड़े
मंगेश डांगरे, भारत जवादे, शिरीष तिडके, पुष्पा डाबरे, निलय गडेकर, ऋषिकेश नागोसे, अलका पोपटकर उपस्थित होते.