हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

झाडाझडती✍️विनोद देशमुख —– अजितदादांची फटकार गडबडले ‘चौकीदार’

spot_img

झाडाझडती✍️विनोद देशमुख
——————————————-
अजितदादांची फटकार
गडबडले ‘चौकीदार’

साडेतीन वर्षांपूर्वीच्या ‘सकाळचा (पहाटेचा नव्हे) शपथविधी’ प्रकरणानंतर प्रथमच पुन्हा चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आणि उबाठा गटाचे संजय राऊत यांच्यातील कलगीतुरा सध्या महाराष्ट्राचे मनोरंजन करीत आहे. “आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नाही” अशा कडक शब्दात अजितदादांनी राउतांना जाहीरपणे सुनावलं. मविआचा उपद्व्याप हटृानं घडवून आणणाऱ्या राउतांना मित्रक्षातून असं पहिल्यांदाच ऐकावं लागलं.

त्यामुळे त्यांनीही जवाब दिला- “अजितदादा माझे मित्र आहेत. पण मी कुणाच्या बापाला भीत नाही. फक्त शरद पवारांचंच ऐकतो.” त्यावर दादांनी पलटवार केला- “कोण संजय राऊत ? मी त्यांचं नाव घेतलेलं नाही.” शेवटी राउतांना नमतं घ्यावं लागलं- “अजितदादा गोड माणूस आहे हो” त्यानंतरही दादांनी फटकारलंच आणि आपल्याशी भेट झाल्याचा राउतांचा दावा नाकारून त्यांना चक्क खोटं ठरवलं.

Advertisements

या सवालजवाबात राउतांनी एक वेगळाच फाटा फोडला. ते म्हणाले की, “मविआतील घटकपक्षांनी एकमेकांची काळजी घेण्यात गैर काय आहे ? आम्ही मविआचे चौकीदार आहोत. मविआ टिकावी यासाठी आम्ही सारे चौकीदारी करतो.” दादांच्या वक्तव्यावरून मात्र तसं जाणवत नाही. पक्षाच्या मुखपत्रातून त्यांनी त्यांची त्यांची भूमिका मांडावी, असं दादांनी ठणकावलं आहे. उबाठा गटाशी ‘सामना’ करण्याच्या तयारीनं दादा बोलल्याचं दिसत आहे. मविआचं नेतृत्व हळूहळू उद्धव ठाकरेंकडे जात असल्याचं पाहून दादांच्या या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि ते पुन्हा ‘बंडा’च्या मूडमध्ये आल्याचं जाणवतं. अर्थात् राष्ट्रवादी आणि मविआ दोन्ही टिकविण्यासाठी काका प्रयत्नांची शर्थ करतील, हे उघड असल्यानं पुतण्याचा यावेळचा ‘प्रयत्न’ही वाया जाण्याचीच चिन्हं दिसत आहेत.

ते असो. पण ‘चौकीदार’ हा शब्द बऱ्याच काळानंतर आणि चांगल्या अर्थानं ऐकायला मिळाला, ही अजितदादा एपिसोड 2 ची मोठी उपलब्धी मानावी लागेल. 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान होताना नरेन्द्र मोदींनी स्वत:ला प्रधान सेवक, चौकीदार संबोधत देशवासीयांपुढे सादर केलं. तेव्हा वाटलं होतं की, 60-65 वर्षांच्या लोकशाहीनंतर का होईना, चौकीदार या पदाला देशव्यापी सन्मान प्राप्त होईल. पण कसचं काय, मोदींविरुद्ध मुद्दा सापडत नसलेल्या विरोधी पक्षांनी “चौकीदार चोर है” अशा उलट्या बोंबा ठोकून चौकीदार शब्दाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. (पुढच्या निवडणुकीत ते त्यांच्यावरच उलटलं, हा भाग वेगळा.)
अन् आता अचानक संजय राऊत स्वत:ला चौकीदार म्हणवून घेत आहेत. चौकीदार चोर है… म्हणणारे पक्ष मविआचे घटक असताना त्यांना चौकीदार शब्द चालतो का ? राऊत स्वत: पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपाखाली तुरुंगात जाऊन आलेले असल्यामुळे त्यांच्या तोंडी चौकीदार शब्द शोभतो का ? असे प्रश्न लोकांना पडू लागले आहेत बघा