हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

ज्येष्ठ पत्रकार संघपाल गडलिंग समाजहित रत्न पुरस्काराने सन्मानित

spot_img

ज्येष्ठ पत्रकार संघपाल गडलिंग समाजहित रत्न पुरस्काराने सन्मानित

नागपुर : निर्भिड ज्येष्ठ पत्रकार संघपाल गडलिंग यांचा समाजहित रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या वतीने वाड़ी, हिंगणा परिसरात हा गौरव करण्यात आला. शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे यांच्या हस्ते गडलिंग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संघपाल गडलिंग २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. अनेक लोकप्रिय दैनिकांच्या माध्यमातून त्यांनी तळागाळ्यातील व्यक्तींना लेखनीच्या माध्यमातून न्याय मिळऊन दिला. शासन व प्रशासनाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार गडलिंग यांनी केले. त्यांच्या या समाजकार्याची दखल घेऊन राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाने संघपाल गडलिंग यांचा समाजहितरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला.

Advertisements

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष सुदर्शन गोडघाटे तर प्रमुख अतिथी राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव विजय खवसे होते. यावेळी सोहळ्याला राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष गजानन ढाकुलकर, भीमराव लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार सौरभ पाटील यांनी केले. डॉ. अंकुश बुरंगे यांनी आभार मानले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पत्रकार विलास माडेकर, गजानन तलमले, प्रवीण गजभिये यांनी परिश्रम घेतले.