ज्या दिवशी आमच्या महिला आर्थिक परिवर्तनाचे हत्यार उपसनार तेव्हाच महिलां मुक्त
बागडे!
वाडी WH न्यूज़ – संपूर्ण जगात महिला मुक्तीच्या नारा बुलंद आज बुलंद होताना दिसतो परंतु आजपण आमच्या देशात स्त्रियांना आर्थिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला लागतो ज्या दिवशी आमच्या महिला आर्थिक परिवर्तनाचे हत्यार उपसनार तेव्हाच महिलां मुक्त होतील असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले आंबेडकरी महिला मोर्चा च्या नागपूर विभागाच्या महिला नेत्या छाया डोंगरे यांनी वाडी परिसरातील खडगाव रोड येथील इंदिरा नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त रंगारंग कार्यक्रम आयोजित केला होता.
या प्रसंगी माया डोंगरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटो ला पुष्पहार अर्पण केले तर बागडे सरांनी दिपप्रज्वलन केले.महिलांनी विविध प्रकारच्ये वस्त्र परिधान करून नुत्य करून महिलांचे मनोरंजन केले माया ताई यांनी आपल्या विचारातून सावित्रीबाई फुले जिजाऊ,माई रमाई,मदर तेरेसा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे पटवून सांगितले.
ओबीसी नेते राजू पांजरे यांनी सावित्रीबाई रमाबाई आंबेडकर यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे आयोजक छाया डोंगरे यांनी लहान मुलांना व महिलांना पारितोषिक वितरण केले या प्रसंगी वाडी दवलामेटी आंबेडकर नगर लावा दाभा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या