हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

जिल्ह्यातील गावगाडा थांबणार! ◼️ महसूल कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संपाला सुरुवात

spot_img

जिल्ह्यातील गावगाडा थांबणार!

◼️ महसूल कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संपाला सुरुवात

गोंदिया : महाराष्ट्र राज्यामध्ये आज (ता. १० ) पासून सुरू होत असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलनाचे अनुषंगाने आज गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण महसुली कार्यालयातील कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून आंदोलनाला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे, महसूल कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील विविध कार्यालयीन कामे प्रभावित होऊन गावगाडा थांबणार आहे.

Advertisements

दांगट समितीचा अहवाल मंजूर करणे व रिक्त पदे भरणे आदी मागण्यांना घेवून महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकरण्यात आले आहे. यापुर्वी झालेल्या आंदोलनात राज्य शासनाने राज्य महूसल कर्मचार्‍यांना मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची पुर्तत: होत नसल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व महसुली कर्मचाऱ्यांकडून १० जुलैपासून टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

या अनूषंगाने आज आंदोलनाच्या पहिल्यादिवशी जिल्हा मुख्यालयासह, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी, आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी-मोरगाव, तिरोडा येथील तालुकास्तरीय सर्व कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून कार्यालयीन कामे केली तर उद्या ११ जुलै रोजी दुपार नंतर कार्यालयावर निदर्शने, १२ जुलै रोजी लेखनीबंद आंदोलन तर १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात सर्व महसूल कर्मचार्‍यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

संपामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्रास होणार आहे. 
आंदोलनात प्रामुख्याने दांगट समितीचा अहवाल मंजूर करणे व रिक्त पदे भरणे या मागण्यांना घेवून हे संप पुकारण्यात आले असून याचा फायदा सर्व सामान्य जनतेला देखील होणार आहे. मात्र, या संपामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्रास होणार आहे. तेव्हा संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो.

Advertisements

-आशिष प्र. रामटेके,
जिल्हाध्यक्ष तसेच राज्य सहसचिव महसूल कर्मचारी संघटना महाराष्ट्र