जम्मू दीप नाल्याच्या काठावरील सर्वांच्या घरा घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ…! संपूर्ण नागपूर शहर जलमय
नागपूर : लाडेकर -ले -आउट महालक्ष्मी नगर सोबतच सच्चिदानंद नगर येथील जम्मूदीप नाल्याला भयंकर पुर आला असून आजूबाजूच्या घराघरात पाणी शिरलेले आहे त्यापैकी विद्याताई टेकाडे यांच्या घरची परिस्थिती अशी आहे बघा ! आणि घरामध्ये पाणी शिरल्याने सोपे / भांडी तरंगत आहे. घरातील माणसे सोप्यावर बसलेले आहे. हे परिस्थिती आज पावसाने निर्माण केलेली आहे. घरात नाल्याचे घाणं पाणी शिरले सर्व घर खराब झालेले आहे. घरातील धान्य सुद्धा पाण्यामध्ये खराब झाल्याने खूप नुकसान झालेले आहे. मनपाने नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीने तेथील नागरिक मागणी करीत आहे.
यांच्या मदतीला कोण धावून येणार हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. नाल्या काठावरील नागरीक विद्याताई टेकाडे, टीकाराम डुंबरे, सुधीर टेटे, ज्ञानेश्वर विलायतकर, कैलासराव बानाईत, प्रभाकरराव टेटे, अजय राऊत या सर्वांच्या घरी पाणी घुसल्याने तारांबळ झालेली आहे. आणि दोन-चार घंट्या पासून सतत पाऊस असल्यामुळे वीज खंडित झाली असून प्रत्येकां घरात अंधार पडलेला आहे. घाण पाण्यामध्ये साप सुद्द्धा तरंगळत दिसून येत आहे तर त्यांची एवढी मोठी तारांबळ झाली असून याकडे मनपा ने लक्ष वेधावे.
नागरिकांनी आपले मत व्यक्त केले ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नाल्याचे काम सुरू केले होते यापूर्वी तीन महिने काम बंद होते. तेव्हा काम केले नाही ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम चालू केल्यामुळे सर्व नागरिकांच्या घरात पाणी शिरल्या गेले. यालाच कारणीभूत मनपा प्रशासन आहे. अशा प्रकारे नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.