हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

जमिन अधिग्रहणाच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा..! २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

spot_img

जमिन अधिग्रहणाच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा..!
२४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अमरवती –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जमीन अधिग्रहणाचे प्रकरण 2016 पासुन नागपूर उच्च न्यायालयात चालु असुनही काही लोकप्रतिनिधी समाजातील दलालांना हाताशी धरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी राजकारण करुन कुरघोडी करत आहेत. इर्विन परिसरातील स्मारकासाठी जमिन कशी हस्तांतरित करावी यावर पुढाकार न घेता न्यायालयातील प्रकरण कसे कमजोर करता येईल त्यातुन त्यांचा हा मानस दिसतो. हे आंबेडकरी अनुयायी सहन करणार नाही.

इर्विन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जमीन अधिग्रहणा संदर्भात वेळोवेळी अमरावती शहर पोलिस आयुक्त व अमरावती जिल्हाधिकारी यांना विविध पक्ष-संघटनांनी दिलेल्या निवेदनच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. जनमानसांच्या भावना लक्षात न घेता 2016 पासुन हे प्रकरण सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यतत्परता दर्शविलेली नाही. आता हा लढा लोक चळवळीतुनच मार्गी लागु शकतो. या संदर्भात 24 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता पासुन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनापासून सुरू होत असल्याची माहिती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भुसंपादन आंदोलन समिती ने दिली.या संवैधानिक लढ्यात आपण शामिल होवुन प्रत्यक्ष सहभागी होवून सहकार्य करन्याचे आव्हान आयोजकांनी केले.

Advertisements