हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

घर झडतीत मॅग्जीनसह पिस्तुल जप्त ◼️स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई

spot_img

घर झडतीत मॅग्जीनसह पिस्तुल जप्त

◼️स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई

गोंदिया,  : गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने केलेल्या छापामार कारवाईत शहरातील सावराटोली येथील एका घरातून मॅग्जीनसह पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. हि कारवाई (ता. २७ ) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून सुमित विनोद महानंदे (वय ३२) व भुपेंद्र विनोद महानंदे (वय २८) दोघेही राहणार सावराटोली, बजाज बार्ड, गोंदिया असे आरोपींचे नाव आहे.

Advertisements

पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी सन- उत्सव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात अवैध कृती करणारे, जनसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसावा याकरिता अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करणाचे निर्देश दिलेले आहेत. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने गोंदिया शहरात पेट्रोलिंग करत असताना आरोपी सुमित महानंदे याचेकडे पिस्तुल व मॅग्जीन असल्याची गुप्त माहिती मिळाली. या आधारे आरोपी सुमितच्या घराची झडती घेतली असता त्याच्या बेडरुम मधील लाकडी दिवानमध्ये एक पिस्टल मॅगझिनसह किमती २५ हजार रुपये अवैधरित्या मिळुन आले.

याप्रकरणी आरोपी सुमित महानंदे व भुपेंद्र महानंदे या दोघांच्या विरुद्ध पो. ठाणे गोंदिया शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, सह कलम १३५ म. पो. का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी सुमित हा फरार असून पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहेत.