हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

घरफोडीतील आरोपी मुद्देमालासह जेरबंद

spot_img

घरफोडीतील आरोपी मुद्देमालासह जेरबंद

गोंदिया : शहरातील गौतमनगर येथे घडलेल्या घरफोडीतील आरोपीला शहर पोलिसांनी 30 मार्च रोजी अटक केली. फरहान ईशाक कुरेशी (19, रा.गौतमनगर) असे आरोपीचे नाव आहे.
गौतमनगर येथील दिनेश पुरनलाल मेश्राम सहकुटूंब बाहेरगावी गेले असता अज्ञात आरोपीने घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख असा 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे फरहान ईशाक कुरेशी याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी सोन्याची नथ, लॉकेट, सोन्याची अंगठी असे 28 हजार रुपयांचे दागिने व 8 हजार रोख असा 36 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलिस हवालदार कवलपालसिंग भाटीया, जागेश्‍वर उईके, दीपक रहांगडाले, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, निशिकांत लोंदासे, रिना चौव्हाण, पोलिस शिपाई दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते, कुणाल बारेवार यांनी केली.

Advertisements