हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोंदिया गारठला.. विदर्भात गोंदियात सर्वाधिक थंड ◼️ ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

spot_img

गोंदिया गारठला.. विदर्भात गोंदियात सर्वाधिक थंड

◼️ ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, गोंदिया जिह्वात काश्मीर!

गोंदिया: राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. आधी कडाक्याची थंडी, त्यानंतर पाऊस आणि आता पुन्हा एकदा थंडी परतली आहे. आज शुक्रवार ३ जानेवारीला विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे करण्यात आली असून ८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

Advertisements

विदर्भात सर्वाधिक थंड गोंदिया असला तरी त्यापाठोपाठ नागपूरचा क्रमांक येतो. विशेष म्हणजे, २ जानेवारीला नागपूरचे तापमान ८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. त्यातच गोंदियाचे तापमान ९.८अंश सेल्सिअस नोंदवले होते. मात्र, दुसरीकडे आजच्या तापमानावर लक्ष दिल्यास गोंदियाचे कमाल तापमान 28.8 तर किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअसने नोंदवण्यात आले आहे. तर नागपूरचे कमाल तापमान 30.4 व किमान तापमान 9.0 एवढे आहे. तर विदर्भातील इतर जिल्हे पाहता 11 अंशाच्या वर तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या वर्षात राज्यातील वातावरणात सातत्याने बदल घडून आले. आता नवीन वर्षातही वातावरणात बदल दिसून येत आहे. डिसेंबर २०२४ अखेरीस राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यातच, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा थंडीने जोर पकडला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पारा घसरलाय. त्यामुळे त्याठिकाणी गुलाबी थंडी जाणवत आहे. तर विदर्भात मात्र अवघ्या २४ तासात वातावरणात बदल झाला आहे. अवघ्या २४ तासात किमान तापमान साडेपाच अंशाने कमी झाले आहे. परिणामी विदर्भात विशेषतः गोंदिया जिल्ह्यात बोचर्‍या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

◼️वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम

Advertisements

यंदा हिवाळ्याला सुरुवात होऊनही अपेक्षित अशी थंडी जाणवली नाही, त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या मध्यात पारा घसरून 8 अंशावर आला होता, त्यानंतर ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व आता पुन्हा थंडी असे बदल वातावरण झाले आहे. मात्र, या वातावरण बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून खोकला, शर्दी, ताप आदी आजार बळावले आहे. त्यामुळे रुग्णालयात गर्दी वाढली असून रुग्णांच्या रांगा दिसून येत आहे.

◼️शेकोट्या पेटल्या ….

गारठा वाढल्याने नागरिकांना बोचर्‍या थंडीच्या सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक असल्याने गावोगावी 10 वाजतापर्यंत शेकोट्या पेटल्याच्या दिसून आले. तर शहरी भागातही नागरिक थंडीपासून बचाव करताना दिसले.

Advertisements