हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोंदियात महिलेचा विनयभंग आरोपीला पाच वर्षाचा कारावास ◼️ मुख्य न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांचा निकाल : 12 हजार रुपये द्रव्यदंडाचीही शिक्षा

spot_img

गोंदियात महिलेचा विनयभंग आरोपीला पाच वर्षाचा कारावास

◼️ मुख्य न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांचा निकाल : 12 हजार रुपये द्रव्यदंडाचीही शिक्षा

गोंदिया : महिलेला एकटी असल्याचा फायदा घेवून तिच्या मनात लज्जा निर्माण करून विनयभंग केल्याप्रकरणी गोंदियाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज, (ता. 10) दिलेल्या निकालात आरोपीला दोषी ठरवत 4 वर्षे साधा व एक वर्ष सश्रम अशी पाच वर्षे कारावास तर 12 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. हेमराज उर्फ हेमु ब्रिजलाल वाधवानी (वय 58 वर्ष, रा. हरीकाशी नगर, माताटोली, गोंदिया) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Advertisements

घटनेच्या दिवशी 17 ऑक्टोबर 2021 रोजी साकाळी 11: 45 वाजताच्या सुमारास पिडीत महिला फिर्यादीला एकटी पाहून आरोपी हेमराज उर्फ हेमू वाधवानी याने तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरुन गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात अपराध क्रमांक- 760/2021 कलम 354, 354(अ), भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात आरोपी हेमराज उर्फ हेमु वाधवानी यास अटक करुन सबळ साक्ष पुरावे गोळा करण्यात आले. दरम्यान, तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन तपासाअंती आरोपीविरुध्द मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया येथे दोषारोपपत्र सादर केले. या आधारे न्यायालयात फौजदारी खटला केस क्रमांक- 504/2021 प्रमाणे खटला चालविण्यात आला. ज्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता कमलेश दिवेवार यांनी युक्तिवाद केला.

दरम्यान, न्यायालयात खटल्याचे सुनावणीत आरोपी विरूध्द सबळ साक्ष पुराव्यावरून दोष सिध्द झाल्याने आज 10 जुलै रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी आरोपी हेमराज उर्फ हेमू यास 4 वर्ष साधा व 1 वर्ष सश्रम कारावास अशी पाच वर्षे कारावास आणि 12 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी कामकाज पोलीस हवालदार ओमराज जामकाटे, पोलीस शिपाई किरसान यांनी केले.
०००००००