हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोंदियात नाल्याच्या पुराने घर कोसळले ◼️एकाचा मृत्यू एकजण बेपत्ता

spot_img

गोंदियात नाल्याच्या पुराने घर कोसळले ◼️एकाचा मृत्यू एकजण बेपत्ता

गोंदिया : रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय झाले असून शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुराने नाल्यालगत असलेला घर कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण बेपत्ता झाल्याची घटना आज, ( दि. १०) सकाळच्या सुमारास घडली आहे.
जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस आल्याने जिल्ह्याभरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या लगत असलेला एक घर पाण्यात कोसळला ज्यामध्ये दिपिन अग्रवाल (वय २७) या युवकाचा मृत्यू झाला असून किरण अग्रवाल (वय ५०) या मलम्याखाली दबल्याची माहिती आहे. तर अनिल अग्रवाल (वय ५२) हे यातून थोडक्यात बचावले आहेत. दीपिन अग्रवाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून. किरण अग्रवाल यांचा शोध कार्य प्रशासनाच्या वतीने सुरू आहे.

◼️शहरात सर्वत्र पाणीच पाणी…

Advertisements

रात्रभर झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असताना सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असतानाच शहरातील रानी अवंतीबाई चौकात जवळपास तीन ते चार फुट पाणी तर अंडरग्राऊंड मार्गावरही पाणी साचल्याने मार्ग बंद झाले आहे. त्याचबरोबर शहरातील सहयोग हॉस्पीटल मध्येही पाणी शिरल्याने येथील रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांची व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
००००००