हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोंदियाजवळ शिवशाही बसला भीषण अपघात ◾️ 12 ते 13 प्रवाशांचा मृत्यू 15 हून अधिक प्रवासी जखमी ◾️ गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्य महामार्गावरील खजरी पुलावरील घटना

spot_img

गोंदियाजवळ शिवशाही बसला भीषण अपघात

◾️ 12 ते 13 प्रवाशांचा मृत्यू 15 हून अधिक प्रवासी जखमी

◾️ गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्य महामार्गावरील खजरी पुलावरील घटना

Advertisements

गोंदिया : भंडाराकडून गोंदियाच्या दिशेने येत असलेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बस ला भीषण अपघात घडून 12 ते 13 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 15 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज, शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्य महामार्गावरील खजरी-डव्वा जवळील पुलावर घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचाव कार्याला सुरूवात केली आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एम.एच.09 इ.एम.1273 क्रमांकांची शिवशाही बस भंडाराकडून 30 ते 35 प्रवासी घेऊन गोंदियाकडे येत असताना सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी-डव्वा या गावशिवारातील नाल्याजवळ दुपारी 12 वाजताच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाका नियंत्रण सुटला. दरम्यान, बस रस्त्याच्या कडेवर उलटली. हा अपघात एवढा भीषण होता की, यात 12 ते 13 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 15 हून अधिक प्रवासी जखमी असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून बचाव पथकाने घटनास्थळ गाठून बचाव कार्याला सुरूवात केली आहे. या अपघाताची भीषणता पाहून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

◾️जिल्हा प्रशासन एक्शन मोडवर…

Advertisements

जिल्हा प्रशासनाने अपघाताची तातडीने दखल घेतली असून, जखमींना चांगले वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहे. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.

असे आहेत जखमी…
अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना कळकर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात नैतिक प्रकाश चौधरी (वय 8 रा. कामठी) श्रीकृष्ण रामदास ऊके (वय 47 रा. कोसबी, भंडारा), शारदा अशोक चौहान (वय 63 रा. नागपूर), पल्लवी प्रकाश चौधरी (वय 33 रा. कामठी), लक्ष्मी धनराज भाजीपाले (वय 33 रा. गोंदिया), स्वप्नील सुभाष हेमणे ( वय 40 रा. नागपूर), विद्या प्रमोद मडेकरी ( रा. 63 रा. नागपूर), भार्गव राजेश कडू (वय 15 रा. नागपूर) धृवावर स्वप्नील हेमणे (वय 6 रा. नागपूर), टिका यशवंत दिघे (वय 17 रा. सोमलपूर) यांचा समावेश आहे.