हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गजानन किर्तीकर शिंदे गटात; संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, कीर्तिकरांना लोक उद्यापासून विसरनार !

spot_img

गजानन किर्तीकर शिंदे गटात; संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, कीर्तिकरांना लोक उद्यापासून विसरनार !

मुंबई: खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा धक्का वगैरे काही नसल्याचं स्पष्ट केलं. कीर्तिकर पक्षातून गेल्याने फार मोठी सळसळ झाली नाही. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील, असं संजय राऊत म्हणाले. तसेच निष्ठा म्हणजे काय? मी तर पक्षासाठी तुरुंगात जाऊन आलो. अजून काय निष्ठा हवी? असा सवालही राऊत यांनी केला.

गजानन कीर्तिकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षाने त्यांना काय दिलं नाही? पाचवेळा आमदार राहिले. दोन्ही मंत्रिमंडळात मंत्री राहिले. दोनवेळा खासदार राहिले, असं सांगत संजय राऊत यांनी कीर्तिकर यांना दिलेल्या पदांची जंत्रीच वाचून दाखवली.

Advertisements

कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर शिवसेनेसोबत आहेत. अमोल हे कट्टर शिवसैनिक आहेत. उम्र की पडाव की बात है. आणखी काही नाही. अमोलने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

न्यायाची व्याख्या काय? मला तर चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकलं. तरीही मी पक्षात आहे. संकटात जे पक्षासोबत राहतात त्याला निष्ठा म्हणतात. कीर्तिकरांसारखे नेते सर्व काही प्राप्त करून भोगून निघून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते. फार फार मोठी सळसळ झाली असं काही नाही. गेले ठिक आहे. उद्यापासून लोकं त्यांना विसरून जातील, असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात शिवशाही राबवतील असं विधान कीर्तिकर यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. ती काही अमृतवाणी नाही. शिववाणी नाही.

Advertisements

आपण गेलात. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं. कीर्तिकर गेल्याने पक्षाला काहीच धक्का बसलेला नाही. पुन्हा निवडून यायचं आहे ना त्यांना. किती येतात ते पाहू, असं आव्हानही त्यांनी दिलं.

आमची दिशा योग्य आहे की नाही हे जनता ठरवेल. अंधेरीच्या निवडणुकीत पाहिलं, दिशा कोणती योग्य आहे ते दिसलं. याच परिस्थितीत आमचं चिन्हं गेलं आणि पक्षाचं नाव गेलं. तरीही 68 हजार मते पडली. लोकांनी मतं दिली. ही दिशा योग्यच आहे. आता मशाल, उद्धव ठाकरे आणि शिवसेना पुढे जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय चुकीचा होता, असा दावा कीर्तिकर यांनी केला. त्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. राजकारणात अनेक निर्णय घ्यावे लागतात. ते आम्ही घेतले, असं ते म्हणाले.

Advertisements