क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या वतीने 2023 आयसीसी मेन्स् क्रिकेट वर्ल्ड कपकरिता किटचे अनावरण
नागपुर – क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA)च्या वतीने आज भारतात 2023 आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपकरिता खेळण्याचा संच (प्लेइंग किट)चे अनावरण करण्यात आले.
यावेळी खेळाडूंच्या पोशाखाची निर्मिती अपेरल पार्टनर ASICS ने केली तर फर्स्ट नेशन्स डिझाईन ही ऑस्ट्रेलियाच्या सर्व आंतरराष्ट्रीय प्लेइंग किटवर झळकणार आहे.
खेळाडूंच्या किटमध्ये ग्लोबल टेक्नॉलॉजी कंपनी तसेच सध्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया पार्टनर, एचसीएल टेकचा लोगो बाहीवर दिसेल.
पहिल्यांदाच आयसीसी इव्हेंटकरिता एचसीएल टेक’ला ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत टीमचे प्रायोजकत्व लाभले असून त्यांच्या ट्रेनिंग किटवर त्याची छबी दिसणार आहे.
एचसीएल टेक 2019 पासून डिजीटल पार्टनर असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या डिजीटल असेटमध्ये सीए लाईव्ह अॅप cricket.com.au आणि PlayCricket सह कम्युनिटी क्रिकेट प्रोसेसचे डिजीटायजिंग तसेच स्ट्रीमलाइनिंग परिवर्तन आणण्यास साह्य करत आहे.
एचसीएल टेक’चा लोगो ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप किटच्या बाहीवर झळकेल.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे एक्झिक्युटिव्ह जनरल मॅनेजर ब्रॉडकास्ट अँड कर्मशियल, स्टीफनी बेल्ट्रमे म्हणाले:
“आम्ही HCLTech सोबतचे आमचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्सुक आहोत. आमच्या अलीकडे घोषित करण्यात आलेल्या पाच वर्षांच्या नूतनीकरणानंतर, भागीदारीतील ही आणखी एक रोमांचक संधी आहे.
“आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप हा स्पोर्टिंग कॅलेंडरवरील एक प्रमुख कार्यक्रम आहे, ज्याची जागतिक पोहोच प्रचंड आहे. त्यामुळे HCLTech मधील विश्वसनीय जागतिक ब्रँड ऑस्ट्रेलियन संघाला मैदानावर आणि मैदानाबाहेर पाठबळ देताना आम्हाला आनंद होतो आहे.”
एचसीएल टेक’चे चीफ मार्केटिंग ऑफिसर, जिल कॉऊरी म्हणाल्या:
“आम्हाला क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतची आमची भागीदारी पुढे नेण्यास आणि 2023 आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाला पाठिंबा देण्यास रोमांचित वाटते.
“एचसीएलटेक ब्रँड हा जागतिक क्रीडा समुदायामध्ये उद्देश-नेतृत्वाच्या भागीदारीचे समानार्थी नाव असून आम्ही आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपकडे एचसीएलटेक’चे सादरीकरण करण्याची आणि क्रिकेटला एक खेळ म्हणून साजरा करण्याची संधी म्हणून पाहतो.”
आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप किटचे प्रकाशन क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या किट वीकमध्ये होते.
ज्यात नवीन बिग बॅश लीग आणि आंतरराष्ट्रीय किट्सचे अनावरण त्याचप्रमाणे बिग बॅश लीगचे अनन्य ऑन-फिल्ड आणि सपोर्टर हेडवेअर भागीदार म्हणून मिशेल अँड नेसची घोषणा देखील झाली.
ऑस्ट्रेलिया रविवार, 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे भारताच्या विरुद्ध वर्ल्ड कप कॅम्पेन सुरू करणार आहे.