केंद्र सरकारच्या मॅचिंग ग्रँटच्या सर्व योजनांना शंभर टक्के निधी;लाभार्थ्यांना निधी देणाऱ्या सर्व योजना ‘डीबीटी’ कराव्या-  उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्र सरकारच्या मॅचिंग ग्रँटच्या सर्व योजनांना शंभर टक्के निधी;लाभार्थ्यांना निधी देणाऱ्या सर्व योजना डीबीटी’ कराव्या  उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रशासकीय विभागांच्या वार्षिक कार्यक्रम 2024-25 च्या आखणीचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा 

मुंबईदि. 17 :- राज्याच्या विकासाची गती वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावा. केंद्र सरकारच्या मॅचिंग ग्रँटच्या सर्व योजनांसाठी शंभर टक्के निधीची तरतूद करण्यात येईलअशी ग्वाही वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सर्व योजना आधार लिंकींग करतानाच वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्यासाठी अनुदानाच्या रकमा डिबीटीच्या (डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर) माध्यमातून त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश श्री. पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात गृह (पोलीस)ऊर्जाआदिवासीनगरविकासदिव्यांग कल्याणमहिला व बालविकासराज्य उत्पादन शुल्कसार्वजनिक आरोग्यमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयक्रीडा व युवक कल्याणगृह(बंदरे)खारभूमीलाभक्षेत्र विकाससामाजिक न्याय (सर्वसाधारण)वैद्यकीय शिक्षणमहसूलपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास अशा 18 विभागांच्या वार्षिक कार्यक्रम 2024-25 आखणी संदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी सामाजिक न्याय  (सर्वसाधारण) तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफआदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे  (व्हिसीद्वारे)सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंतक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे  उपस्थित होते. 

विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीसर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडील सर्व योजनांचा फेरआढावा घ्यावा. एकसारख्या उद्देशाच्या व लाभांच्या योजनांना एकत्रित करावेकालसुसंगत नसणाऱ्या कालबाह्य योजना तातडीने बंद कराव्यातप्रत्येक योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे. योजनायंत्रणा व स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरण करावे. अनुत्पादक अनुदानात कपात करतानाच उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

            प्रशासकीय खर्चावर नियंत्रण आणतानाच राज्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध आर्थिक स्रोत विकसित करावेत. राज्यातील सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी कृतीशील प्रयत्न करावेत. कामांचे प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक कामांसाठी निधी वापरावा. निधी खर्चाबाबत यंत्रणा उत्तरदायित्व निश्चित करुन कालमर्यादेत निधीचा वापर करावा. पूर्ण झालेल्या कामांची उपयोजिता प्रमाणपत्रे तातडीने सादर करावीत. कामाच्या दर्जात कोणत्याही प्रकारची तडजोड करू नयेअसे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

            यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिकक्रीडा व युवक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव तथा व्यय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ताउर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्लाआदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारेगृह(बंदरे) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियानगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराजवैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेदिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजनमहिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादवमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळेसामाजिक न्याय(सर्वसाधारण) विभागाचे सचिव सुमंत भांगेआयुक्त ओमप्रकाश बकोरियावित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए. आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए