ईव्हीएम मशीन भांडाफोड परिवर्तन यात्रा राज्यात निघाली
-11 मार्च ला इंदौरा मैदान नागपुर सभा
-भारत मुक्ति मोर्चा ने घेतली पत्रकार परिषद
टिळक पत्रकार भवन नागपुर – ईव्हीएम मशीन भांडाफोड परिवर्तन यात्रा कश्मीर ते कन्याकुमारी पर्यत निघालेली होती . परंतु कोविड 19 च्या कारणामुळे ती राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा आंध्र प्रदेशा पर्यंतच जाऊ शकली परंतु आता ही ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा पार्ट – टू ची सुरुवात महाराष्ट्रातून 21 फरवरी 2023 ला मुंबईहून झालेली असुन 13 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे . सदर यात्रा 11 मार्च 2023 ला नागपूर ला आगमन होत आहे .
त्यानिमित्त इंदोरा मैदान उत्तर नागपूर येथे सायंकाळी 5.00 वाजता सभेचे आयोजन केलेले आहे . ही परिवर्तन यात्रा भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष व बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय संयोजक मा वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात निघालेली आहे ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याच्या मा . वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय स्तरावर संघटित शक्तीच्या माध्यमातून सतत राष्ट्रव्यापी जनजागृती करीत आहेत त्यामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या बुद्धिजीवी व राजनीतिक नेत्यांना ईव्हीएम मशीनच्या गडबड घोटाळ्याची माहिती मिळत आहे .
सन 2000 च्या पूर्वी देशात कोणत्याही राजकीय पार्टीला बहुमत मिळत नव्हते . परंतु सन 2004 च्या निवडणुका नंतर त्यांना बहुमत मिळू लागले याचे मुख्य कारण ईव्हीएम मशीन द्वारे होणारी हेराफेरी आहे . ईव्हीएम मशीन मार्फत मतांची हेराफेरी करून काँग्रेसने आपल्या बहुमताचे सरकार बनवले याचा अर्थ काँग्रेसने पहिल्यांदा ईव्हीएम मशीन मध्ये हेराफेरी केली . परंतु सध्या फायदा बीजेपीला झालाय व होत आहे बीजेपी व कॉंग्रेस पार्टी एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत . परंतु ईव्हीएम मशीनच्या विरोधात ना कॉंग्रेस बोलत आहे ना बीजेपी बोलत आहे ज्यावेळी बीजेपीचे सर्वात मोठे नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी होते त्यावेळी सुद्धा लोकसभेत त्यांना १८६ च्या आकडा ओलांडता आल्या नाही परंतु सन 2014 च्या निवडणुकीत बीजेपी ने 283 आणि सन 2019 च्या निवडणुकीत तीनशे तीन असा आकडा पार केला आहे.
याचे कारण ईव्हीएम मशीन मध्ये केलेली हेराफेरी आहे काही लोकांना वाटते की ईव्हीएम मशीन मध्ये हेराफेरी होऊ शकत नाही परंतु 8 ऑक्टोंबर 2013 च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालात असे स्पष्ट नमूद आहे की ईव्हीएम मशीन मार्फत मुक्त , निष्पक्ष व पारदर्शी निवडणुका संपन्न होऊ शकत नाही याचा अर्थ स्पष्ट होतो की ईव्हीएम मशीन मशीन मध्ये हेराफेरी होते . 1 ) 24 एप्रिल 2017 रोजी माननीय सुप्रीम कोर्टा ने ईव्हीएम मशीनच्या विरोधात निर्णय देताना स्पष्ट म्हटले आहे की मशीन बरोबर पेपर ड्रिल मशीन लावून त्यातून निघणाऱ्या चित्र्यांची जुळणी करावी .
परंतु पेपर ट्रेलच्या विरोधात काँग्रेसने मा . सुप्रीम कोर्टात पेपर ट्रेल मशीनच्या कागदाची फक्त -25 % 50 % मोजणी करावी अशी याचिका दाखल केली . त्यामुळे 8 एप्रिल 2019 ला मा . सुप्रीम कोर्टाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात फक्त 5 % कागदी मतपत्राची मिलान करण्याच्या आदेश दिला . शिवाय ईव्हीएम 2 ) 3 ) 4 ) दिनांक : -2 मशीनच्या सोबत पेपर टेल च्या कागदाच्या मिलान करण्याच्या वेळी कांग्रेसचे लोक उपस्थित राहत नाही . त्यामुळे ईव्हीएम मशीनच्या खेळ चालू राहतो . अशा प्रकारे काँग्रेस आणि बीजेपी नाटक करून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम करीत आहेत . याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती देशातील जनतेला नाही .
ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करून ब्राह्मणशाही लागू केलेली आहे या विरोधात ही ईव्हीएम मशीन भांडाफोड परिवर्तन यात्रा आहे ● याव्यतिरिक्त देशात काँग्रेस व बीजेपी ने मोठ्या प्रमाणात सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण केलेले आहे व आजही करीत आहेत . सरकारी उद्योग कवळीमोल भावात उद्योगपतींना दिले जात आहेत व मोठ्या प्रमाणात उद्योगपतींना करमाफी देण्यात आलेली आहे . त्या बदल्यात बीजेपीला 614 कोटी व काँग्रेसला 95 कोटी उद्योगपतींनी दिले . या खाजगीकरणामुळे प्रतिनिधित्व ( आरक्षण ) शून्य झाले व एससी एसटी ओबीसीच्या रोजगार संपला म्हणून खाजगीकरणाच्या विरोधात सुद्धा ही परिवर्तन यात्रा आहे . स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर सुद्धा ओबीसीची जातीनिहाय जनगणना ना कॉंग्रेस ने आहे ना बीजेपी सरकार होत करीत आहे हे ओबीसीच्या विरोधातील सर्वात मोठे षडयंत्र आहे निश्चित संख्या नसल्याचे कारण सांगून ओबीसीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली गेली नाही व त्यांना हक्क अधिकारापासून सुद्धा वंचित ठेवण्याच्या कार्यक्रम सुरु आहे म्हणून ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी म्हणून देखील ही परिवर्तन यात्रा सुरू आहे .
त्याचप्रमाणे देश , संविधान व लोकशाहीला वाचण्यासाठी ही 365 दिवसाची ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा सुरू आहे . पत्रकार परिषदला प्रो बी एस हस्ते , राष्ट्रीय प्रभारी राष्ट्रिय अन्याय अत्याचार निवारण शक्ति यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. हरीश उईके , प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी , जगन्नाथ गवई , शहराध्यक्ष , बहुजन मुक्ति पार्टी , रायभांजी डाहाट , बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क , उपस्थित होते .