हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

आम्रवृक्ष वाटप करून साजरा केला वाढदिवस

spot_img

आम्रवृक्ष वाटप करून साजरा केला वाढदिवस

गोंदिया : भाजपाचे नेते तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गजानन डोंगरवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ४ जुलै रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विविध मान्यवर, वृक्षप्रेमी तथा प्रगतिशील शेतकऱ्यांना विविध प्रजातींच्या कलमी आंब्यांच्या रोपट्यांचे वितरण केले.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा येथील डॉ. गजानन डोंगरवार हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपा तालुका अध्यक्षपदापासून तर जिल्हास्तरावरील पदे त्यांनी भूषविली. सध्या ते जनता सहकारी बँकेचे संचालक आहे. तसेच स्व. शाम रावबापू स्मृती प्रतिष्ठान साकोलीचे अध्यक्ष आहेत. राजकीय क्षेत्रासह सहकार क्षेत्रात ते अग्रसेर आहे. सामाजिक कार्यातही डॉ. डोंगरवार यांचा मोठा वाटा आहे. आपल्या सामाजिक कार्यात त्यांनी अनेक समाजाभिमुख कार्य केले आहे. अनेक सणांचे औचित्य साधून त्यांनी गोरगरीबांना मदतीचा हात दिला आहे.

Advertisements

एवढेच नव्हे, तर आपल्या ४ जुलै या वाढदिवसानिमित्त दरवर्षीच वेगवेगळे उपक्रम राबवून आपला वाढदिवस ते साजरा करतात. यावर्षी त्रिमूर्ती पेट्रोल पंपावर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात पत्रकारांसह विविध मान्यवरांना आंब्याचे रोपटे भेट देण्यात आले. यावेळी डॉ. गजानन डोंगरवार, माजी सरपंच कुंदा डोंगरवार, पंचायत समिती सदस्य डॉ. नाजूक कुंभरे, रत्नदीप दहिवले, अश्विन गौतम, सुरेंद्रकुमार ठवरे, सुधीर कापगते, संतोष डोंगरवार, शालिक राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
०००००००००००