आंभोरा खुर्द येथे हवन कार्य हळदीकुंकू कर्यक्रम व मान्यवरांच्या हस्ते समाजभवनाचे भूमीपूजन
कुही/– तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामपंचायत आंभोरा खुर्द येथे हळद कुंकवाचा कार्यक्रम. तसेच मानव धर्माचे संस्थापक जुमदेवबाबा यांच्या सांगीतलेल्या मार्गावर चालण्यासाठी हवनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गावातुन शोभायात्रा काढण्यात आली. त्याचवेळी गावात खासदार कूपाल तुमाने यांच्या निधीतुन दहा लक्ष रुपयाचे समाज भजनाचे भुमीपुजन करण्यात आले यावेळी बाबा जुमदेव यांच्या मानव धर्मावर मान्यवरांनी प्रकाश टाकला .
यावेळी कार्यक्रमाला रामटेक लोकसभा श्रेत्राचे खासदार कूपाल तुमाने. आमदार राजुभाउ पारवे. जि. प. सदस्या कविता साखरवाडे. माजी जि. प. सदस्य मनोज दादा तितरमारे. कार्यक्रमाचे आयोजक तथा गावचे सरपंच राजुभाउ कुकडे. सायत्रा भोंगाडे.शालुताई कांबळे. कोठी राम शास्त्रीकार. महादेव भोंगाडे. ग्रामसेवक राखडे. सुरेश शेलोटे. सिर्सिच्या सरपंच नंदा दाबडदुबके. आवर्जून उपस्थित होते यावेळी तालुक्यातील व्यसनमुक्ती साठी काम करीत राहु नव्याने व्यसनाधिनाच्या आहारी जणा-या नव युवकांसाठी अवगत काम करत राहु अशे वचन नागरीकांना देत येथील सरपंच राजुभाउ कुकडे यांनी व्यक्त केले