Category: WH NEWS

  • नोबेल स्पोर्ट्स अकॅडमीच्या बालिकांची एनडीएफए इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

    नोबेल स्पोर्ट्स अकॅडमीच्या बालिकांची एनडीएफए इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

    नोबेल स्पोर्ट्स अकॅडमीच्या बालिकांची एनडीएफए इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

    वाडी, नागपूर –(WH न्यूज )
    नोबेल स्पोर्ट्स अकॅडमी (NSA) यांना अभिमानाने जाहीर करायचे आहे की त्यांच्या तीन कनिष्ठ बालिकांची निवड नाशिक डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन (NDFA) च्या संघात करण्यात आली आहे. हा संघ आगामी इंटर डिस्ट्रिक्ट ज्युनियर गर्ल्स फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे सहभागी होणार आहे.

    निवड झालेल्या खेळाडू — गौरी पाटील, जिनिशा कोल्टे आणि सृष्टी सिंग — या वाडी परिसरातील रहिवासी आहेत. या तिन्ही खेळाडूंनी मैदानावर उत्कृष्ट कामगिरी, संघभावना आणि शिस्तबद्धता दाखवली आहे. एनएसएमध्ये सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीमुळे त्यांना ही गौरवपूर्ण संधी प्राप्त झाली आहे की त्यांनी जिल्हास्तरावर आपली प्रतिभा सादर करावी.

    एनएसएच्या प्रशिक्षकांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “ही कामगिरी अकॅडमीच्या त्या प्रयत्नांचे फलित आहे जे ग्रामीण आणि शहरी पातळीवर फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महिला खेळाडूंना सशक्त बनवण्यासाठी केले जात आहेत.”

    एनएसएच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “आमच्या बालिकांच्या निवडीबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान आहे. हा क्षण संपूर्ण एनएसए परिवार आणि वाडी परिसरासाठी गौरवाचा आहे. त्यांच्या मेहनतीने आणि शिस्तीनेच त्यांना या उंचीवर नेले आहे.”

    निवड झालेल्या खेळाडूंना नोबेल स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष श्री. हर्षल काकडे यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांना आगामी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले.

    नोबेल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे गौरी पाटील, जिनिशा कोल्टे आणि सृष्टी सिंग यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येतात की त्या शिरपूर येथे होणाऱ्या या स्पर्धेत एनडीएफए आणि एनएसएचे नाव उज्ज्वल करतील.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दीपावली मिलन कार्यक्रमातून डिजिटल मीडियाला वगळल्याने निर्माण झाले प्रश्न!

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दीपावली मिलन कार्यक्रमातून डिजिटल मीडियाला वगळल्याने निर्माण झाले प्रश्न!

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दीपावली मिलन कार्यक्रमातून डिजिटल मीडियाला वगळल्याने निर्माण झाले प्रश्न!

    नागपूर |WH न्यूज

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 23 -10-2025 ला नागपूर येथील त्यांच्या सरकारी निवासस्थान ‘देवगिरी’ येथे पत्रकारांसाठी दीपावली मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला शहरातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र डिजिटल मीडियाशी संबंधित पत्रकारांना या आमंत्रण यादीतून वगळण्यात आल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

    सूत्रांच्या माहितीनुसार, पत्रकारांची यादी नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली होती. जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही यादी न गेल्याने डिजिटल मीडिया पत्रकारांची नावे त्यात समाविष्ट होऊ शकली नाहीत. जर ही यादी माहिती कार्यालयातून गेली असती, तर काही डिजिटल पत्रकारांची नावे नक्कीच समाविष्ट झाली असती, असे मानले जात आहे.

    अलिकडेच नागपूरमध्ये डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ यांनी पारंपरिक पत्रकार परिषदांना न जाता स्वतःचे स्वतंत्र डिजिटल कार्यालय सुरू केले आहे. या उपक्रमामुळे प्रेस क्लब आणि तिलक पत्रकार भवन येथे होणाऱ्या पारंपरिक पत्रकार परिषदांवरील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळेच नाराज झालेल्या प्रेस क्लबने डिजिटल मीडिया पत्रकारांची नावे प्रस्तावित केली नाहीत, अशी चर्चा सध्या माध्यम वर्तुळात जोरात सुरू आहे.

    माध्यम क्षेत्रात आता ही चर्चा सुरू झाली आहे की, जेव्हा राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही डिजिटल माध्यमांना प्रोत्साहन देत आहेत, तेव्हा नागपूरच्या डिजिटल पत्रकारांना मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमातून का वंचित ठेवले गेले? हा फक्त “स्नेहभोजन”चा मुद्दा नाही, तर “सन्मान आणि समान संधी”चा प्रश्न आहे.

    डिजिटल मीडिया पत्रकार आणि संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी केली आहे की, पुढील पत्रकार परिषदांमध्ये किंवा शासकीय कार्यक्रमांमध्ये डिजिटल मीडिया प्रतिनिधींनाही समान स्थान व आमंत्रण द्यावे. तसेच, जिल्हा माहिती अधिकारी यांच्या माध्यमातून सर्व मान्य पत्रकारांची अद्ययावत यादी तयार करून त्यानुसार आमंत्रणे पाठवावीत — जेणेकरून कोणत्याही माध्यमातील पत्रकारांवर भेदभाव होणार नाही.

    मीडिया तज्ञांचे मत आहे की, पत्रकारितेचे भविष्य आता डिजिटल माध्यमांमध्येच आहे आणि शासनाने या बदलत्या माध्यम जगतातील प्रवाह ओळखून डिजिटल पत्रकारांनाही योग्य सन्मान दिला पाहिजे.


    डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाचे प्रत्यूत्तर : “स्नेहभोजन नव्हे, स्नेह आणि सन्मान महत्त्वाचे”

    या विषयावर प्रतिक्रिया देताना डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाचे महासचिव विजय खवसे म्हणाले,
    “आम्हाला जर सन्मानपूर्वक आमंत्रण मिळाले असते, तर आम्ही नक्कीच कार्यक्रमात सहभागी झालो असतो. स्नेहभोजन आमच्यासाठी महत्त्वाचे नाही, तर मुख्यमंत्री यांच्यासोबत डिजिटल मीडियाचा स्नेह आणि संवाद अधिक महत्त्वाचा आहे.”

    ते पुढे म्हणाले, “सरकारने डिजिटल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन पुढील कार्यक्रमांमध्ये डिजिटल पत्रकारांनाही आमंत्रित केले पाहिजे. आमचा स्नेह सर्व पत्रकार आणि संघटनांशी कायम आहे. डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाचे व्यासपीठ सर्वांसाठी सदैव खुले आहे.”

  • ‘ महाज्योती’च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  ‘महाज्योती’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

    ‘ महाज्योती’च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाज्योती’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

    ‘ महाज्योती’च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ‘महाज्योती’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

    नागपूर, WH NEWS-  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज आकारास आले आहे. येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त ठरणार आहे. याला आपण इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामुळे गती मिळाली. या विभागाच्या माध्यमातून होतकरू नवीन पिढी आकारास येईल तसेच त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    सदर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, परिणय फुके, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री बोलताना पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाला पुढे नेण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यात प्रशिक्षण, स्वयंरोजगार यांचा समावेश आहे. ओबीसी समाजातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महाज्योतीची निर्मिती केली असून याला पुरेसा निधी उपलब्ध केला आहे. आज ओबीसी मुलासाठी 60 पेक्षा जास्त वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. महाज्योतीतून प्रशिक्षण घेऊन मुले विविध स्पर्धा परिक्षेत यश संपादन करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ओबीसी समाजाची नॉन क्रिमिलिअर मर्यादा आपण आठ लाखांपर्यंत नेली आहे. ओबीसी समाजाच्या कल्याणसाठी शासन तत्पर असल्याचे ते म्हणाले.

    शैक्षणिक प्रगतीचा पाया घालणारा क्षण- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाज्योती संस्थेच्या स्वतंत्र इमारतीची पायाभरणी आज झाली आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. नागपूरच्या भूमीवर आता ‘महाज्योती’ची भव्य 7 मजली प्रशासकीय इमारत तयार होणार आहे. हा केवळ वास्तूचा नव्हे तर शैक्षणिक प्रगतीचा पाया घालणारा क्षण असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

    ही प्रशासकीय इमारत शिक्षणासह संस्कार आणि संशोधनासाठी आदर्श मापदंड ठरेल- मंत्री अतुल सावे

    नागपूर येथील महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीत वाचनालय, समुपदेशन कक्ष, प्रशिक्षण कक्ष, भोजन कक्ष आणि 248 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय अशा सर्व सुविधांचा समावेश असणार आहे. ही वास्तू म्हणजे शिक्षण, संस्कार आणि संशोधनाचा पवित्र संगम राहणार आहे. नाशिक येथे देखील महाज्योती संस्थेचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 174 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्री श्री. सावे यावेळी म्हणाले.

    महाज्योती संस्थेतून प्रशिक्षण घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार व महाज्योतीच्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आला. तसेच सात मजली प्रशासकीय इमारत बांधकामाची चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी केले. आभार मुख्य लेखा अधिकारी प्रशांत वावगे यांनी मानले. तर सूत्रसंचालन दिनेश मासोडकर यांनी केले.

     

    अशी असेल सात मजली प्रशासकीय इमारत

    राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी उभारली जाणाऱ्या भव्य 7 माळ्याची प्रशासकीय इमारतीचे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) मार्फत होत आहे. महाज्योतीच्या कार्यक्षमतेत आणि सेवाक्षमतेत अभूतपूर्व वाढ घडवणारा हा पायाभूत उपक्रम ठरणार आहे. या प्रशासकीय इमारतीत तळघर क्रमांक 1 व 2 मध्ये मुबलक वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळमजल्यावर 500 लोकांच्या क्षमतेचे ऑडिटोरियम, अभ्यास कक्ष, नियंत्रण कक्ष आणि उपहारगृह असणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांवर अधिकारी व कर्मचारी यांची बैठक व्यवस्था तसेच प्रशासकीय सभागृह असतील. तिसऱ्या मजल्यावर अभिलेख कक्ष व उपहारगृह, तर 4, 5, 6 आणि 7 व्या मजल्यांवर प्रशिक्षण कक्ष आणि बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. ही इमारत आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक बांधणी आणि कार्यक्षम जागा नियोजनाचा सुंदर संगम ठरणार आहे.

  • पत्रकार ओमराज सरदार यांना मातृशोक…आशाबाई सरदार यांचे निधन!

    पत्रकार ओमराज सरदार यांना मातृशोक…आशाबाई सरदार यांचे निधन!

                              निधन वार्ता

    पत्रकार ओमराज सरदार यांना मातृशोक…आशाबाई सरदार यांचे निधन!
    नागपूर: झुलेलाल हाउसिंग सोसायटी, हरिहर नगर, बेसा नागपूर येथील रहिवासी आशाबाई श्रीराम सरदार (वय 79) यांचे आज गुरुवार, दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2:45 वाजता दीर्घ आजाराने मिडास हॉस्पिटल, रामदासपेठ, नागपूर येथे निधन झाले.

    महिन्याभरापूर्वीच त्यांच्या पती श्रीराम सरदार यांचेही निधन झाले होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    बुद्धवासी आशाबाई ह्या आवाज इंडिया टीव्हीचे स्टार रिपोर्टर ओमराज सरदार यांच्या मातोश्री होत.
    त्यांच्या पश्चात दोन मुली, चार मुले तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
    त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या शुक्रवार, दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1:00 वाजता मानेवाडा घाटावर करण्यात येणार असल्याची माहिती ओमराज सरदार यांनी दिली.

     

  • लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) नागपूर शहर अध्यक्षपदी बबलुजी कडबे यांची निवड

    लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) नागपूर शहर अध्यक्षपदी बबलुजी कडबे यांची निवड

    लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) नागपूर शहर अध्यक्षपदी बबलुजी कडबे यांची निवड
    नागपूर (WH NEWS )– लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) अंतर्गत नागपूर शहर अध्यक्षपदी मा. बबलुजी कडबे यांची निवड करण्यात आली आहे.
    लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चिरागजी पासवान, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री, यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन वाढवण्यासाठी दलीत चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते बबलुजी कडबे यांना हा प्रतिष्ठित पदभार सोपवण्यात आला आहे.

    मा. कडबे गेल्या २० वर्षांपासून दलीत सेना आणि रामविलास पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय सहभाग, अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेऊन समाजाला न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे म्हणून ते परिचित आहेत.


    महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. प्रमोदजी कुदळे यांनी विश्वास व्यक्त करत सांगितले की, बबलुजी कडबे यांचा नागपूर शहर अध्यक्ष म्हणून कार्यभार पार पाडताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहतील.

    या निवडीवर अनेक मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. यामध्ये मा. पंकजनी मनोहरे (विदर्भ संपर्क प्रमुख), तुषार मोहोड (विदर्भ राज्य सरचिटणीस), नागेश मून, कवी तन्हा नागपूरी, राजू गायकवाड, प्रशांत बन्सोड, दिपकजी बुग्गेवार,शैलेश देव, सुरेशजी गाणार, रोशन बारमासे यांचा समावेश आहे.

  • डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निवेदन दिले — डिजिटल पत्रकारांना शासनमान्यता व सुविधा देण्याची मागणी

    डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निवेदन दिले — डिजिटल पत्रकारांना शासनमान्यता व सुविधा देण्याची मागणी

    डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निवेदन दिले — डिजिटल पत्रकारांना शासनमान्यता व सुविधा देण्याची मागणी

    नागपूर (विजय खवसे) — डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ, नागपूर तर्फे शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे डिजिटल मीडिया पत्रकारांना शासनमान्यता, सुविधा आणि संरक्षण मिळावे, तसेच डिजिटल माध्यमाच्या प्रगतीसाठी आवश्यक बाबी शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली.

    निवेदन देताना संघाचे अध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव विजय खवसे आणि कोषाध्यक्ष अमित वानखडे उपस्थित होते.

    सध्या डिजिटल मीडिया हे माहिती प्रसाराचे सर्वात प्रभावी माध्यम बनले आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत बातम्या, सरकारी योजना आणि सामाजिक प्रश्न तत्काळ पोहोचविण्यात डिजिटल मीडियाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, शासनमान्यता, सुविधा आणि संरक्षण या दृष्टीने डिजिटल पत्रकारांना अद्याप न्याय मिळालेला नाही, असे संघाचे म्हणणे आहे.

    संघाने सादर केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —

    🔹 शासनमान्यता (Accreditation): जिल्हास्तरावर कार्यरत डिजिटल न्यूज पोर्टल्स व त्यांच्या प्रतिनिधींना शासनमान्य पत्रकार म्हणून मान्यता द्यावी.
    🔹 ‘डिजिटल मीडिया भवन’ उभारणी: जिल्हा मुख्यालयावर डिजिटल पत्रकारांसाठी स्वतंत्र भवन उभारण्यात यावे, जेथे पत्रकार परिषद, बैठक व संपादकीय कार्ये पार पाडता येतील.
    🔹 वाहतूक सुविधा व प्रवास सवलत: डिजिटल पत्रकारांना बस, रेल्वे व विमान प्रवासात शासनमान्य पत्रकारांप्रमाणे सवलती देण्यात याव्यात.
    🔹 शासन योजनांमध्ये समावेश: मान्यता प्राप्त डिजिटल पत्रकारांना पत्रकार कल्याण निधी, विमा योजना, निवास योजना आदींचा लाभ मिळावा.
    🔹 पत्रकार संरक्षण कायद्यात समावेश: महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्यात डिजिटल मीडिया पत्रकारांचा स्पष्ट समावेश करण्यात यावा.
    🔹 प्रशिक्षण व कार्यशाळा: जिल्हा माहिती कार्यालयामार्फत डिजिटल पत्रकारांसाठी तंत्रज्ञान, पत्रकारिता नीती आणि सायबर सुरक्षा विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात.
    🔹 प्रेस रिलीज वितरणात समावेश: जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित होणारे सर्व शासकीय प्रेसनोट्स डिजिटल मीडियालाही नियमितरित्या पाठवावेत.
    🔹 जाहिरात वाटप धोरण: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जाहिरात वाटप धोरणात डिजिटल मीडियाला स्वतंत्र व समान स्थान देण्यात यावे.
    🔹अधिवेशनांमध्ये प्रतिनिधित्व: मुंबई अधिवेशन तसेच नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान होणाऱ्या पत्रकार बैठकीसाठी संघाच्या एका प्रतिनिधीला आमंत्रित करण्यात यावे.

    संघाने स्पष्ट केले की, या सर्व मागण्या डिजिटल माध्यमांच्या प्रगतीसाठी आणि पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहेत. शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंती संघाने केली आहे.

  • रेशमबाग में होगा विशाल प्रबुद्ध जनसभा का आयोजन — सांसद चंद्रशेखर आझाद रावण करेंगे संबोधित

    रेशमबाग में होगा विशाल प्रबुद्ध जनसभा का आयोजन — सांसद चंद्रशेखर आझाद रावण करेंगे संबोधित

    रेशमबाग में होगा विशाल प्रबुद्ध जनसभा का आयोजन — सांसद चंद्रशेखर आझाद रावण करेंगे संबोधित
    नागपुर : आझाद समाज पार्टी (कांशीराम) की ओर से 14 अक्टूबर को दोपहर 1 बजे कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशमबाग, नागपुर में विशाल प्रबुद्ध जनसभा का आयोजन किया जा रहा है। इस सभा को उत्तर प्रदेश के नागीना से सांसद तथा पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद रावण संबोधित करेंगे।

    दीक्षाभूमी पर जाकर डॉक्टर भीमराव आंबेडकर को नमन करेंगे.
    इस संदर्भ में जानकारी डिजिटल न्यूज पोर्टल संघ कार्यालय में आयोजित पत्रकार परिषद में दी गई। पत्रकार परिषद में पार्टी के केंद्रीय प्रभारी एवं पूर्व मंत्री गौरीप्रसाद उपासक ने सभा के आयोजन की रूपरेखा प्रस्तुत की।
    इस अवसर पर राज्य प्रभारी रुपेश बागेश्वर, प्रवक्ता गुणवत गिरडकर, जिलाध्यक्ष संदीप मेश्राम एवं विनोद नागदेवते उपस्थित थे।

    नागपुर में डिजिटल मीडिया संघ की यह पहली पत्रकार परिषद रही। संघ के अध्यक्ष संतोष गायकवाड व सचिव विजय खवसे ने आझाद समाज पार्टी के पदाधिकारियों का स्वागत कर उपस्थित मान्यवरों का सत्कार किया।
    सभा के माध्यम से सामाजिक न्याय, संविधानिक मूल्य, तथा बहुजन समाज के हक्कों से संबंधित विषयों पर चर्चा होने की संभावना जताई जा रही है।

  • डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाची महत्वपूर्ण बैठक रविभवनात पार पडली. -जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची उपस्थिती; डिजिटल पत्रकारांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प.- नागपुरात डिजिटल मीडियाचे भव्य कार्यालय स्थापन.. लवकरच होईल उदघाटन

    डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाची महत्वपूर्ण बैठक रविभवनात पार पडली. -जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची उपस्थिती; डिजिटल पत्रकारांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प.- नागपुरात डिजिटल मीडियाचे भव्य कार्यालय स्थापन.. लवकरच होईल उदघाटन

    डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाची महत्वपूर्ण बैठक रविभवनात पार पडली.
    -जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची उपस्थिती; डिजिटल पत्रकारांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प.- नागपुरात डिजिटल मीडियाचे भव्य कार्यालय स्थापन.. लवकरच होईल उदघाटन

    नागपूर, दि. ११ ऑक्टोबर २०२५ (विजय खवसे)
    डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाची महत्वपूर्ण बैठक शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी रविभवन मिटिंग हॉल, नागपूर येथे पार पडली. या बैठकीस जिल्हा माहिती अधिकारी श्री. विनोद रापतवार यांनी विशेष उपस्थिती लावून सर्व पत्रकार व संपादकांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमादरम्यान श्री. रापतवार यांचा संघातर्फे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष भीमराव लोणारे व नूतन अध्यक्ष संतोष गायकवाड यांचा देखील सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक महासचिव विजय खवसे यांनी केले, तर आभार कोषाध्यक्ष अमित वानखडे यांनी मानले.
    संघाचे सहसचिव आमजेद शेख,व सदस्य
    शैलेश गडपायले, नावेद आझमी, राजेश पांडे, हसीफ शेख, अमित वांद्रे, शीतल नंदनवार, प्रदीप कुमार, नेहाल पाटील, रियाज शेख तसेच नागपूर व परिसरातील मोठ्या संख्येने डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक व पत्रकार उपस्थित होते.
    बैठकीत डिजिटल मीडिया क्षेत्रातील विविध मागण्या व सूचना जिल्हा माहिती अधिकारी श्री. रापतवार यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या.

    डिजिटल पत्रकारांना शासनमान्यता, सुविधा व संरक्षण देण्याची गरज असल्याचे सर्वांनी अधोरेखित केले.
    डिजिटल मीडिया प्रतिनिधींच्या प्रमुख मागण्या :
    • शासनमान्यता (Accreditation):
    जिल्हास्तरावर कार्यरत डिजिटल न्यूज पोर्टल्स व त्यांच्या प्रतिनिधींना शासनमान्य पत्रकार म्हणून मान्यता द्यावी.
    • ‘डिजिटल मीडिया भवन’ उभारणी:
    पत्रकार परिषद, बैठक व संपादकीय कार्यासाठी स्वतंत्र “डिजिटल मीडिया भवन” जिल्हा मुख्यालयावर उभारण्यात यावे.
    • वाहतूक सुविधा व प्रवास सवलत:
    डिजिटल पत्रकारांना बस, रेल्वे व विमान प्रवासात शासनमान्य पत्रकारांप्रमाणे सवलतीचा लाभ द्यावा.
    • शासन योजनांमध्ये समावेश:
    मान्यता प्राप्त डिजिटल पत्रकारांना पत्रकार कल्याण निधी, विमा योजना, निवास योजना आदींचा लाभ मिळावा.
    • पत्रकार संरक्षण कायद्यात समावेश:
    महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्यात डिजिटल पत्रकारांचा स्पष्ट समावेश करावा.
    • प्रशिक्षण व कार्यशाळा:
    जिल्हा माहिती कार्यालयामार्फत डिजिटल पत्रकारांसाठी तांत्रिक, नैतिक व सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित कराव्यात.
    • प्रेस रिलीज वितरणात समावेश:
    जिल्हा माहिती कार्यालयाकडून जारी होणाऱ्या सर्व सरकारी प्रेसनोट्स डिजिटल मीडिया प्रतिनिधींनाही नियमित पाठवाव्यात.
    • जाहिरात वाटप धोरण:
    माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जाहिरात धोरणात डिजिटल मीडियाला स्वतंत्र व समप्रमाणात स्थान द्यावे.
    बैठकीत उपस्थित सर्व पत्रकारांनी एकमुखाने निर्णय घेतला की या सर्व मागण्या शासनाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात याव्या.
    डिजिटल माध्यम हे आजच्या युगातील सर्वात प्रभावी व त्वरित माहिती देणारे माध्यम असल्याने शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करावा, अशी नम्र विनंती करण्यात आली.नागपुरात डिजिटल मीडियाचे भवन उभारण्यात आले. ज्यांना ज्यांना डिजिटल मीडियावर आपला आवाज या माध्यमातून पहचवीला जाईल, पत्रकार परिषदेची व्यवस्था करण्यात आली.

  • CJI गवई पर जूता फेंकने की कोशिश: सुप्रीम कोर्ट में सनसनी, वकील राकेश किशोर निलंबित

    CJI गवई पर जूता फेंकने की कोशिश: सुप्रीम कोर्ट में सनसनी, वकील राकेश किशोर निलंबित

    CJI गवई पर जूता फेंकने की कोशिश: सुप्रीम कोर्ट में सनसनी, वकील राकेश किशोर निलंबित
    नई दिल्ली, 6 अक्टूबर 2025:
    देश की सर्वोच्च न्यायालय में आज उस समय हंगामा मच गया जब एक वकील ने मुख्य न्यायाधीश (CJI) डी. वाई. गवई पर जूता फेंकने की कोशिश की। यह घटना कोर्ट की कार्यवाही के दौरान हुई, जिससे कुछ देर के लिए माहौल तनावपूर्ण बन गया।
    घटना के तुरंत बाद सुरक्षा कर्मियों ने आरोपी वकील राकेश किशोर को काबू में कर लिया। बताया जा रहा है कि आरोपी ने जूता फेंकते हुए नारा लगाया — “सनातन का अपमान नहीं सहेगा भारत।”

    घटना का कारण
    सूत्रों के मुताबिक, आरोपी वकील राकेश किशोर हाल ही में एक याचिका के फैसले से नाराज़ था, जिसमें “विष्णु” शब्द को लेकर टिप्पणी की गई थी। इस विवाद के चलते वह न्यायालय में उग्र व्यवहार पर उतर आया।

    CJI गवई का शांत रुख
    घटना के बावजूद CJI बी.आर. गवई ने संयम बनाए रखा और सुरक्षा कर्मियों को निर्देश दिया कि सुनवाई बाधित न हो। कोर्ट ने मामले को “न्यायालय की गरिमा पर हमला” बताते हुए इस पर कड़ी नाराजगी जताई।

    Bar Council की सख्त कार्रवाई
    बार काउंसिल ऑफ इंडिया ने तत्काल प्रभाव से वकील राकेश किशोर का लाइसेंस निलंबित कर दिया है। संस्था ने इसे “न्यायपालिका की स्वतंत्रता और सम्मान के खिलाफ गंभीर अपराध” बताया।

    न्यायिक समुदाय की प्रतिक्रिया
    सुप्रीम कोर्ट के वरिष्ठ वकीलों और अधिवक्ता संघ ने इस घटना की निंदा करते हुए कहा कि यह कृत्य अदालत की गरिमा को ठेस पहुँचाने वाला है।
    कोर्ट के बाहर भी कई वकीलों ने आरोपी के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है।देश द्रोह का मामला दर्ज करने कि मांग देश भर से उठ रही है.

  • नागपूरमधील एचडीएफसी स्काय ग्राहकांपैकी सुमारे 70% उद्योजक आणि स्वरोजगार करणारे आहेत

    नागपूरमधील एचडीएफसी स्काय ग्राहकांपैकी सुमारे 70% उद्योजक आणि स्वरोजगार करणारे आहेत

    नागपूरमधील एचडीएफसी स्काय ग्राहकांपैकी सुमारे 70% उद्योजक आणि स्वरोजगार करणारे आहेत
    नागपूर,  – भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि गतिशील वित्तीय सेवा कंपनी, एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड (एचएसएल) ने त्यांच्या ग्राहक-केंद्रित डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनबद्दल माहिती दिली आणि आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या सहामाहीत आणि त्यानंतर भारताच्या आर्थिक विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला. 25 वर्षांहून अधिक अनुभवासह, एचडीएफसी सिक्युरिटीज उद्योगात आघाडीवर आहे आणि विश्वास, पारदर्शकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम करून लाखो ग्राहकांसाठी गुंतवणुकीचा अनुभव नव्याने सादर करत आहे, ज्यात पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे ग्राहक ते अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ व्यक्ती यांचा समावेश आहे.

    एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर एग्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे प्रमुख, श्री. उन्मेष शर्मा यांनी गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी आणि ब्रँडच्या व्यापक प्रवासाला बळकटी देण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी बदलत्या बाजारपेठेबद्दल आणि त्याचा गुंतवणूकदारांवर होणारा परिणाम याबाबत आपले विचार मांडले. तसेच, आजच्या माहितीपूर्ण आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम गुंतवणूकदारांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी आर्थिक सेवांच्या उद्योगातील बदलांविषयीही मार्गदर्शन केले.

    “महाराष्ट्रात एचडीएफसी स्काय साठी सर्वाधिक योगदान देणारे शहर म्हणून नागपूर उदयास आले आहे. येथे एकूण 11% नवीन ग्राहक जोडले गेले असून, नागपूरने मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूरलाही मागे टाकले आहे. शहरात महिलांचा सहभाग अधिक असून 52% ग्राहक महिला आहेत, तर 48% पुरुष आहेत. गुंतवणुकीसाठी इक्विटी हा प्रमुख पर्याय ठरत असून 97.5% ऑर्डर इक्विटीमध्येच झाल्या आहेत, तर एफ अँड ओ आणि एमटीएफ मिळून केवळ 2.5% आहेत. नागपूरमधील एचडीएफसी स्कायचे सुमारे 70% ग्राहक हे उद्योजक आणि स्वरोजगार करणारे आहेत. तसेच 18 ते 35 वयोगटातील तरुण गुंतवणूकदार एकूण ऑर्डरपैकी 51% आहेत. विशेष म्हणजे, यापैकी 60% ऑर्डर दरमहा 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांकडून आल्या आहेत. यावरून शहरातील कमी उत्पन्न गटातील लोकांमध्येही आर्थिक समावेशन आणि गुंतवणुकीची आवड वाढत असल्याचे दिसून येते.”

    “इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जमधील दहा रिटेल ट्रेडर्सपैकी नऊ जणांना तोटा होतो, आणि वार्षिक सरासरी तोटा 1.1 लाख रुपयांहून अधिक असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे गुंतवणुकीचे निर्णय हे सखोल विश्लेषण किंवा विश्वासार्ह संशोधनाशिवाय घेतले जातात. या आव्हानावर उपाय म्हणून एचडीएफसी सिक्युरिटीजने आपल्या ऑल-इन-वन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म ‘एचडीएफसी स्काय’ साठी नवीन कॅम्पेन सुरू केले आहेत. या प्लॅटफॉर्ममध्ये तीन मुख्य फायदे अधोरेखित केले आहेत – 25 वर्षांहून अधिक मार्केट अनुभवावर आधारित मोफत रिसर्च केलेल्या स्टॉक शिफारसी, संपूर्ण पारदर्शकतेसह फक्त 20 रु. ब्रोकरेज किंवा कोणतेही लपलेले शुल्क नाही, आणि एकाच अॅपमध्ये इक्विटी, म्युच्युअल फंड, ईटीएफ, एफ अँड ओ, कमोडिटीज आणि करन्सीजमध्ये सहज गुंतवणूक करण्याची सुविधा.”
    “एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ इंस्टिट्यूशनल इक्विटीज श्री. उन्मेष शर्मा म्हणाले, ‘एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये आमचे उद्दिष्ट केवळ बाजाराविषयी ठोस माहिती देणे नाही, तर गुंतवणूकदारांना योग्य ज्ञान, स्पष्टता आणि योग्य साधने उपलब्ध करून देणे आहे, ज्यामुळे ते अधिक चांगले आर्थिक निर्णय घेऊ शकतील.

    बाजारपेठ बदलत असताना गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याची आणि त्यांना जोडण्याची पद्धत देखील बदलायला हवी.’ ही चर्चा एचडीएफसी सिक्युरिटीजच्या सतत सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यामध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे, गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवणे आणि स्टेकहोल्डर्ससाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे यावर भर दिला जातो.”
    श्री. शर्मा पुढे म्हणाले,“ एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये आम्ही केवळ प्लॅटफॉर्म देत नाही, तर संधी देतो. भारत एका मोठ्या परिवर्तनकारी दशकाच्या उंबरठ्यावर आहे आणि आमचे ध्येय प्रत्येक भारतीयाच्या हातात गुंतवणुकीची माहिती पोहोचवणे आहे. एचडीएफसी स्काय, संशोधनावर आधारित माहिती आणि वैयक्तिकृत वेल्थ सोल्यूशन्सच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना केवळ गुंतवणूक करण्यास नव्हे, तर योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यास सक्षम करत आहोत.” सात दशलक्षांहून अधिक ग्राहक, 130 हून अधिक शाखा आणि 3,400 व्यावसायिकांच्या टीमसह एचडीएफसी सिक्युरिटीज भारताच्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. कंपनी मानवी दृष्टिकोन आणि डिजिटल नवकल्पना यांचा संगम करून गुंतवणूकदारांना सक्षम करत आहे आणि दीर्घकालीन आर्थिक समृद्धी सुनिश्चित करत आहे.

    “गेल्या वर्षभरात एचडीएफसी सिक्युरिटीजने उल्लेखनीय डिजिटल परिवर्तन साध्य केले असून आपल्या सर्व ग्राहकांना यशस्वीरित्या पुढील पिढीच्या गुंतवणूक प्लॅटफॉर्म ‘एचडीएफसी स्काय’ कडे यशस्वीरित्या स्थलांतरित केले आहे. या अॅपने आधीच 18.5 लाखांहून अधिक ग्राहक जोडले आहेत, 3,586 कोटींपेक्षा जास्त डिमॅट मालमत्ता आणि दरमहा सरासरी 4 लाख कोटींहून अधिक डेरिव्हेटिव्ह्ज टर्नओव्हर नोंदवला आहे. याशिवाय, 5.4 लाखांहून अधिक आयपीओ अर्जही प्रक्रियेत आणले गेले आहेत, ज्यामुळे एचडीएफसी स्काय भारतातील नव्या पिढीच्या गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे अॅप बनले आहे. प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर 4.5 स्टार रेटिंगसह, एचडीएफसी स्काय आपल्या श्रेणीत सर्वात जास्त रेटिंग असलेले अॅप बनले आहे, जे शून्य ब्रोकरेज सुविधा, अत्याधुनिक रिसर्च टूल्स आणि वन-क्लिक इन्व्हेस्टिंग सोल्यूशन्स देऊन ग्राहकांना सहज अनुभव देते. या परिवर्तनामुळे एचडीएफसी सिक्युरिटीज केवळ एक ब्रोकरेज कंपनी न राहता, गुंतवणूकदारांना त्यांच्या संपत्ती निर्माण करण्याच्या प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम करणारे हायपर-डिजिटल इकोसिस्टम म्हणून उभे राहिले आहे.”
    “वेल्थ दैट गोज बियॉन्ड नंबर्स” या तत्त्वानुसार एचडीएफसी सिक्युरिटीजने मजबूत संपत्ती आणि सल्लागार सेवा तयार केली आहे, ज्यामध्ये प्रामाणिकतेवर आधारित सल्ला आणि कमिशन-फ्री शिफारसींवर भर देण्यात आला आहे. कंपनी अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ व्यक्ती (यूएचएनआय), फॅमिली ऑफिसेस आणि कॉर्पोरेट ट्रेझरीसाठी वैयक्तिकृत वेल्थ मॅनेजमेंट सोल्यूशन्स देते. त्यांच्या सेवांमध्ये इक्विटी, म्युच्युअल फंड्स, पीएमएस, एआयए, फिक्स्ड इन्कम, प्रायव्हेट मार्केट्स, रिअल इस्टेट आणि ग्लोबल इन्व्हेस्टिंगसह सर्व आर्थिक गरजांचा समावेश आहे. 25 वर्षांच्या रिसर्च अनुभवासह आणि ग्राहक-केंद्रित नवकल्पना एकत्र करून एचडीएफसी सिक्युरिटीज हे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिकृत, संशोधन-आधारित आणि पारदर्शक मार्गदर्शन प्रदान करते.

    “भारताच्या आर्थिक भविष्यासंदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीज अत्यंत आशावादी आहे. एसअँडपी ग्लोबलच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत भारताचा जीडीपी 7.3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि पुढील दशक परिवर्तनशील ठरेल. कंपनीनुसार या वाढीचे प्रमुख घटक म्हणजे घरगुती बचतींचे इक्विटीमध्ये रूपांतरण, ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत डिजिटल प्रवेश, अनुकूल आर्थिक धोरणे, अनेक वर्षांतील सर्वात कमी महागाई, मजबूत जीएसटी संकलन आणि सरकारी खर्चातील वाढ आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज बँकिंग आणि वित्तीय सेवा, सिमेंट, रिअल इस्टेट, मेटल्स आणि टेलिकॉम यांसारख्या क्षेत्रांबाबत सकारात्मक आहे. मात्र, आयटी, हेल्थकेअर, ग्राहक क्षेत्रे, इंडस्ट्रियल्स, केमिकल्स आणि ऑटोमोबाईल्स यावर तटस्थ दृष्टिकोन ठेवला आहे, तर मिश्रित परिस्थितीमुळे ऑईल आणि गॅस क्षेत्राबाबत सावध भूमिका घेतली आहे.”
    “एचडीएफसी सिक्युरिटीजने H2FY26 आणि त्यानंतरच्या काळासाठी आपल्या स्टॉक शिफारसी जाहीर केल्या आहेत. या शिफारसींमध्ये अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या गुंतवणूकदारांसाठी पुढील संपत्ती निर्माण करण्याच्या संधी ठरू शकतात. लार्ज-कॅपमध्ये कंपनीने लार्सन अँड टुब्रो, युनायटेड स्पिरिट्स आणि अपोलो हॉस्पिटल्स यांची निवड केली आहे. मिड-कॅप संधींमध्ये आयपीसीए लॅब्स, एमसीएक्स, इंडियन बँक आणि पीबी फिनटेक यांचा समावेश आहे, तर स्मॉल-कॅप संधींसाठी शोभा, अंबर आणि नवीन फ्लोरिन यांची शिफारस करण्यात आली आहे.”

    एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड बद्दल
    एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड ही भारतातील आघाडीची वित्तीय सेवा कंपनी असून ती देशभरातील लाखो ग्राहकांना सेवा देते. 25 वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणा, नवकल्पना आणि बाजारपेठेतील अनुभवासह एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड विविध मालमत्ता वर्गांमध्ये पूर्ण गुंतवणूक आणि वेल्थ मॅनेजमेंट सोल्यूशन्स देते, ज्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थिती आणि डिजिटल नवोपक्रम यांचा समावेश आहे.