हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

अवैध जनावरे वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई ◼️3 लाख 39 हजार रुपयाचा माल जप्त

spot_img

अवैध जनावरे वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई

◼️3 लाख 39 हजार रुपयाचा माल जप्त

गोंदिया,  : कत्तलीसाठी अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणार्‍यांवर देवरी पोलिसांनी धडक कारवाई करून 3 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हि कारवाई देवरी तालुक्यातील पिंडकेपार-बोरगाव मार्गावर करण्यात आली.

Advertisements

पिंडकेपार-बोरगाव मार्गावर पिकअप वाहन क्र एम.एच. ३५ ए जे. ५७४४ मध्ये जनावरांची अवैधरित्या वाहतुक करून कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची गुप्त माहिती देवरी पोलिसांना मिळाली या आधारावर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधीकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात देवरीचे ठाणेदार प्रविण डांगे यांच्या सूचनेप्रमाणे बोरगाव चोकात पोलीस पथकासह नाकाबंदी करण्यात आली. यावेळी पिंडकेपार ते बोरगाव मार्गावर एक महिन्द्रा कंपनीचा पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५ एजे ५७४४ यास नाकाबंदी दरम्यान थांबवुन वाहन चालक यास नाव विचारले असता त्यांनी अकलाक अकील शेख, (वय २५ वर्षे, रा. जमनापुर, ता. देवरी जि.गादिया) असे सांगितले.

दरम्यान, वाहनाची पाहणी केली असता मागील डाल्यात ७ जनावरे किमत ३९ हजार रुपये व 3 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकुण ३ लाख ३९ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आले आहे.

◼️आरोपी ताब्यात…
सदर अवैध जनावरे वाहतुक करणार्‍या आरोपीच्या विरोधात कलम११(९)(ड) प्रा.नि.वा. से.का. १९६० सह कलम ५(अ), ९ महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियम१९७६ अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisements