नवरदेव निघाला वसुलबाज …15 लाखांची गाडी मागितली..!लग्न मोडले, 27 मे रोजी होते लग्न…
महिला पीआय असून महिला अत्याचाराबाबत गंभीर नाही…! मुलीवरच दबाव निर्माण करून सूचना पत्र दिले..
10 दिवस उलटूनही कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, शेवटी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चांदूर रेल्वे /अमरवती – लालच किती वाईट आहे हे माहीत असतांना एका वसुलीबाज नवरदेवाने लग्नाच्या नावाखाली कार (गाडी) मागितली, वधु पक्षाने नकार दिल्याने लग्न मोडले.त्याचा हेतू फक्त वधूच्या वडिलांकडून पैसे वसूल करण्याचा होता.
अखेर प्रकरण कुर्हा पोलीस ठाण्यात गेले, तेथेही महिला पीआय गीता तांगडे यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही.10 दिवस उलटूनही गुन्हा दाखल न केल्याने महिला पीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.उलट तरुणीवर दबाव टाकला. सूचना पत्र देवून दाबले.. प्रकरण माझ्या भागातील नाही, असे सांगितले, मुलीचे वास्तव्य त्यांच्या भागातील आहे मग प्रकरण कुठे जाणार असेल?शेवटी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी मनकर्णा नगर चैतन्य कॉलनी अमरावती निवासी विक्की सिद्धार्थ नागदिवे, सिद्धार्थ देवराव नागदिवे,प्रज्ञा सिद्धार्थ नागदिवे आहेत.फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात कलम 3,4 हुंडा बळी कायदा 1961 अनुसार व कलम 500,506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी मात्र कुर्हा पोलिस स्टेशन च्या
महिला पीआई असून महिला अत्याचाराच्या आरोपीला न्याय देवू शकल्या नाही.हे मात्र विशेष..!आरोपी ला का वाचवत होत्या, असा प्रश्न आता पीआय गीता यांच्यावर उठत आहे. गुन्हा दाखल न केल्याने.वसुलीबाज विक्की आणि पीआय मॅडमचा लोभ कुठल्या दिशेला वळणार, हे येणारा काळच सांगेल. कारण हा मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे..!
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्यात खंडणीबाज वर विवेक सिद्धार्थ नागदिवे, मनकर्णा नगर चैतन्य कॉलनी अमरावती निवासी याच्याशी एका मुलीचे लग्न ठरले होते.17 फेब्रुवरी 2023 ला साक्षगन्ध मोठ्या उत्साहात झाला.
शनिवार दिनांक 27 मे 2023 रोजी लग्न होणार होते.त्यापूर्वी वराने वधूकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.त्याने वधूकडे कार (गाड़ी) बुक करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली.वधूने ही बाब तिच्या वडिलांना सांगितली,वडिलांनी 1 लाख रुपये दिले, नववधूने भावासमोर विवेकला 1 लाख रुपये दिले.विवेकने ती रक्कम घेतली. एवढ्यावर तो थांबला नाहीतर 15 लाखांची पुन्हा मागणी केली, एवढी मोठी रक्कम नसल्यामुळे वधूच्या वडिलांनी 15 लाख देण्यास नकार दिला.
आरोपी वसुलीबाज विक्की नागदिवे ने 13 मे रोजी वधूला व्हाट्सएप वर मेसेज टाकून लग्न मोडले.मुलीचे आयुष्य उध्वस्त केल्याने प्रकरण कुऱ्हा पोलीस ठाण्यात गेले.17 मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पीआय गीता तांगडे यांनी केला. प्रकार आमच्या क्षेत्रातले नाही म्हणून चक्क मुलीच्या वडिलांना सूचना पत्र देऊन प्रकरण मिटवण्यात आले.
प्रकरण तुमच्या पोलिस ठाण्याचे नसताना तुम्ही तक्रार का घेतली, दोन्ही पक्षांना बयाना करिता का बोलावण्यात आले, सूचना पत्र का देण्यात आले. क़ाय मूलगी तुमच्या क्षेत्रातील नाही क़ाय ?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एवढेच नाही तर पीआय मॅडमने मुलीवर दबाव टाकून उलटसुलट प्रश्न विचारले.पीआय चक्क आरोपीला पाठीशी घातले आहेत.महिला असूनही महिला अत्याचाराबाबत गंभीर नसलेल्या अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कुऱ्हा पीआयने तक्रार नोंदवून न घेतल्याने तक्रारदार फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तेथील ठानेदार जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता तक्रार दाखल करून घेतली.मात्र कुर्हा पीआई वर प्रश्न आजही निर्माण होत आहे की त्यांनी मग तक्रार का दाखल करून घेतली.
कुऱ्हा पोलिसांनीच गुन्हा दाखल करून उर्वरित तपासासाठी फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनला पत्र लिहून अहवाल मागितला असता तरिही चालले असते कारण कुर्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे.मात्र तसे केले नाही.पीआई मॅडम ने आरोपी सोबत हातमिळवनी केल्याचा डाट शक्यता आहे.मुलीला न्याय हवा .गुन्हेगाराला शिक्षा व्हावी हाच उद्धेश वधु पक्षाचा आहे.आरोपी वर वसूली चा गुन्हा नोंद झाला नाही असा प्रश्न अजुन कायम आहे.वधु पक्षा कडून खंड़नी वसूल करणाऱ्या विक्की नागदिवे वर खण्डनीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
वाचकांना विनंती आहे की विक्की नागदिवे यांचा फोटो बारकाई बघा …दुसऱ्याला पाठवा जने करून या पुढे कोणत्याही मुलीचे आयुष हा वसुलीबाज करणार नाही..जनहितार्थ जारी