सामाजिक राजकीय परिवर्तनाची लढाई आता सामान्य कार्यकर्ता लढणार.
बागडे!
…………………………………………..
अमरावती दि.१ में – आम्ही आजपर्यंत सर्व नेत्यांवर विश्वास टाकून पाहिला पंरतू समाजाच्या पदरी निराशाच आली आम्हाला जे काही मिळाले ते फक्त संविधानाच्या माध्यमातून म्हणून आता संविधानाच्या संरक्षणासाठी सामान्य कार्यकर्ता सामाजिक शैक्षणिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनाची लढाई जिंकून दाखवेल हि आता वेळ आली आहे असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते अमरावती येथे नवनियुक्त पदाधिकारी यांच्या सत्कारा प्रसंगी विश्व शांती बौद्ध विहाराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या प्रसंगी माजी पोलीस अधिकारी दिगांबर भगत यांच्या मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा अमरावती जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ मुंद्रें, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष सुरेश कपूर,प्रा.रमेश दुपारे अमरावती शहर अध्यक्ष राहुल रामटेके, पदाधिकारी शेख हसन, रविंद्र फुले, राशिद अली धर्मा बागडे, भाऊराव बोरकर उपस्थित होते.
बाबूराव धाकडे ललिता वाकपांजर सुमनबाई मोहड सुहासिनी धाकडे, सुमनबाई भटकर, सुनंदा तायडे,प्रभाताई वर्दे सागर भगत यांनी कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले